सांगली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शिवसेनेचे बंडखोर आमदार अनिल बाबर यांच्या सांत्वनासाठी सांगली जिल्ह्यातील (Sangali) विटा येथे आले होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच सांगली दौरा होता. मात्र ऐनवेळी दौऱ्यात बदल करून मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde And Vishwajeet Kadam Meeting) यांनी थेट काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांची भेट घेतली.अचानक झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
[read_also content=”पेपरलेस कामकाजाला प्राधान्य द्या, मुंबई उच्च न्यायालयाची सूचना https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-high-court-declined-to-take-hard-copies-in-environment-pil-nrsr-315688.html”][blurb content=””]
सांगली-मिरज मार्गावर असणाऱ्या भारती हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांची भेट झाली. यावेळी बंद खोलीमध्ये दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. यावेळी भारती हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
भारती हॉस्पिटलमधील सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विश्वजीत कदम यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. मुख्यमंत्री शिंदे हे सांगली दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती.
दरम्यान, विश्वजीत कदम यांनी ही भेट राजकीय नसून केवळ मित्रत्वापोटी आणि कदम घराण्याशी शिंदे यांचे असणारे घनिष्ठ संबंध यामुळे स्वतः मुख्यमंत्री भेटायला आले असल्याचे सांगून यावेळी त्यांना काँग्रेस तर्फे विविध मागण्यांचे निवेदन दिल्याची माहिती ही विश्वजित कदम यांनी यावेळी दिली.