मयुर फडके, मुंबई : बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Bollywood famous actor Nawazuddin Siddiqui) त्याची विभक्त पत्नी आणि अल्पवयीन मुलांनी आपापसातील वाद परस्पर सामंजस्याने सोडवावा या हेतुने गुरुवारी उच्च न्यायालयाने (High Court) सर्वांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
१२ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा यांबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसून विभक्त पत्नी झैनबला त्यांची माहिती उघड करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी हेबियस कॉर्पस (संबंधित व्यक्तीला हजर करण्यासाठी) याचिका नवाजुद्दीनने उच्च न्यायालयात (High Court) केली आहे. दोन्ही मुले विभक्त पत्नीसह दुबईत वास्तव्याला होती. मात्र आपल्याला न कळवताच ती मुलांना घेऊन भारतात आली असून ती सध्या कुठे आहेत त्याबाबत काहीच माहीत नाही. आपल्या मुलांची आणि शिक्षणाची चिंता असून शिक्षणात खंड पडू नये, एवढाच याचिके मागचा हेतू असल्याचा दावाही नवाजुद्दीनने केला होता.
[read_also content=”वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालयाची नवी इमारत, ३०.१६ एकर भूखंड आरक्षित ठेवण्याचा निर्णय; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/new-high-court-building-at-bandra-east-decision-to-reserve-3016-acre-plot-maharashtra-government-information-in-high-court-nrvb-379820.html”]
याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर अल्पवयीन मुलांची काळजी असल्याचे आणि मुलांच्या कल्याणासाठी याचिकाकर्ता व प्रतिवादीमध्ये परस्पर सामंजस्याने तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच नवाजुद्दीन परस्पर संमतीने सोडवण्यास तयार आहे. त्यामुळे नवाजुद्दीन, त्याची विभक्त पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
हे प्रकरण त्याच पार्श्वभूमीवर सहमतीच्या अटींचा प्रस्ताव प्रतिवादीला पाठवण्यात आला आहे. परंतु तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती हे प्रकरण मिटवण्यास तयार असल्याचे वाटत नाही, असे नवाजुद्दीनकडून न्यायालयाला सांगण्यात आले. तर, आपल्यालाही हे प्रकरण मिटवायचे असल्याचा दावा प्रतिवादीनी केला. त्यानंतर हे कौटुंबिक प्रकरण असल्याने याचिकाकर्ता-प्रतिवादींनी आपल्या दोन अल्पवयीन मुलांना सुनावणीसाठी न्यायमूर्तींच्या दालनात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
[read_also content=”वांद्रे पूर्व येथे उच्च न्यायालयाची नवी इमारत, ३०.१६ एकर भूखंड आरक्षित ठेवण्याचा निर्णय; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/new-high-court-building-at-bandra-east-decision-to-reserve-3016-acre-plot-maharashtra-government-information-in-high-court-nrvb-379820.html अकाल तख्तच्या इशाऱ्याचा परिणाम? पंजाब पोलिसांनी अमृतपाल प्रकरणात अटक केलेल्या तब्बल ‘एवढ्या’ आरोपींची केली सुटका https://www.navarashtra.com/crime/update-akal-takht-warning-punjab-police-freed-348-arrests-people-related-with-amritpal-singh-case-nrvb-379811/”]