सातारा : वाईच्या गणपती घाटावर खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.यावेळी माजी आमदार मदन भोसले व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्राणप्रतिष्ठा महासोहळानिमित्ता जागोजागी कार्यक्रम
अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा महासोहळा साजरा होत आहेत. यावेळी देशाच्या विविध भागांत व मंदिरात स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्याप्रमाणे वाईच्या गणपती घाटावर खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी आपल्या समर्थकांसह स्वच्छता मोहिम केली.
भाजपा कार्यकर्ते सहभागी
यावेळी सुनील काटकर काका धुमाळ गीतांजली कदम रंजना रावत विनीत पाटील पंकज चव्हाण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुरभीताई भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अजय मांढरे, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शहराध्यक्ष विजय ढेकणे, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अनिल भिलारे, प्रतापगड उत्सव समितीच्या विजयाताई भोसले, बाजार समितीचे संचालक विवेक भोसले, ग्रामोद्योग आघाडीचे सचिन घाटगे, ज्येष्ठ कार्यकर्ते काशिनाथ शेलार आदी मान्यवर व भाजपा कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपाचे वाई शहराध्यक्ष विजय ढेकाने यांच्या घराच्या भिंतीवर कमळाचे चित्र रेखाटले यावेळी ही शहरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Title: Cleanliness drive at ganapati ghat of vai by mp udayanraje bhosle bjp workers present in large numbers nryb