Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची ‘तिहेरी मेगा घोषणा’! पंढरपुरात पांडुरंगाचा तुळशीहार घालून मुख्यमंत्र्यांचा अभूतपूर्व सत्कार

पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बैलगाडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांचे ४८,००० कोटींचे वीजबिल माफ केल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार; १००% दिवसा मोफत विजेची घोषणा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 15, 2026 | 08:56 PM
पंढरपुरात पांडुरंगाचा तुळशीहार घालून मुख्यमंत्र्यांचा अभूतपूर्व सत्कार

पंढरपुरात पांडुरंगाचा तुळशीहार घालून मुख्यमंत्र्यांचा अभूतपूर्व सत्कार

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची ‘तिहेरी मेगा घोषणा!
  • पंढरपुरात पांडुरंगाचा तुळशीहार घालून मुख्यमंत्र्यांचा अभूतपूर्व सत्कार
  • वाचा सविस्तर बातमी!
पंढरपूर | शिवाजी हळणवर: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर करून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आता साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या शेती वीजजोडण्यांची तब्बल ₹48 हजार कोटींची जुनी थकबाकी माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच वर्षाअखेर राज्यातील 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरीच्या पांडुरंगाचा तुळशीहार व बैलगाडी देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री डॉ. अशोक उईके, भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, प्रदेश सचिव माऊली हळणवर यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या कृषी पंपधारकांना सध्या वीजबिल येत नसले तरी जुन्या थकबाकीची नोंद कायम असल्याने नवीन वीजजोडणीसह विविध सुविधांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी सरकारने ₹48 हजार कोटींची जुनी थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने इतिहास लिहिता आला पाहिजे,” या शब्दांत त्यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यातील 76 टक्के शेतकऱ्यांना सध्या दिवसा मोफत वीज उपलब्ध होत असून, या वर्षाअखेर 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय! तब्बल ४८,००० कोटींचे जुने वीज बिल माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

शेती अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक करण्यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, ड्रिप इरिगेशन, ऑनलाइन सिंचन प्रक्रिया अशा योजनांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, दुष्काळी भागात लाखो शेततळ्यांमुळे शेतीला मोठा आधार मिळाला आहे. अल निनोमुळे अनियमित पावसाचे संकट निर्माण होत असले तरी शेततळी पिकांसाठी जीवनदायी ठरत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

भविष्यातील शेती ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामूहिक शेती व्यवस्थेवर आधारित असणार असल्याचे सांगत, पुढील दोन ते तीन वर्षांत 50 हजार शेतकरी गट उभारण्याचे उद्दिष्ट त्यांनी जाहीर केले. यामुळे शेतीतील गुंतवणूक वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल, पूरक पिकांना चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी, ₹48 हजार कोटींची वीजबिल माफी, 100 टक्के दिवसा मोफत वीज आणि आधुनिक शेतीचा रोडमॅप या घोषणांमुळे राज्यातील बळीराजासाठी सरकारने मोठी विकासात्मक दिशा निश्चित केल्याची भावना कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.

“तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन, म्हणाला, ‘System खऱ्या अर्थाने मुळापासून’

Web Title: Cm devendra fadnavis felicitated with bullock cart in pandharpur announces 48000 cr electricity bill waiver marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Electricity Bill
  • farmer
  • pandharpur

संबंधित बातम्या

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा
1

काय सांगता… Electricity Bill येणार Zero! फक्त ‘हे’ एक काम करा; AC, कूलर, पंखे, मनसोक्त वापरा

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
2

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
3

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?
4

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.