केआरकेचे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
सध्या बॉक्स ऑफिसवर अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट बॉलीवूड विश्वात धुमाकूळ घालत आहे. छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य आणि बलिदानाची कथा या चित्रपटातून दाखवण्यात आली आहे. याच दरम्यान सिनेसमीक्षक कमाल आर. खान उर्फ केआरकेने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. या प्रकरणात शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे. तर केआरकेने विकिपीडियाचा आधार घेत हे ट्वीट केले आहे. दरम्यान आता या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी या व्यवत आयजी विभागाला काही आदेश दिले आहेत.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केआरके ने आक्षेपार्ह मजकूर ट्वीट केला आहे. हा मजकूर त्याने विकीपीडियाच्या मदतीने केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विकीपिडीयावरील मजकूर काढण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबर विकीपीडियाशी संपर्क साधून कारवाई करण्याचे आदेश फडणवीस यांनी सायबर विभागाच्या आयजीना दिले आहेत.
This is the real History! It was never Hindu Muslim! Sambhaji's behaviour, including alleged irresponsibility and addiction to sensual pleasures, led Shivaji to imprison his son at Panhala fort in 1678 to curb his behaviour.[5][6] While another theory suggests that Sambhaji was…
— KRK (@kamaalrkhan) February 17, 2025
केआरकेच्या ट्वीटबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, “विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल जी चुकीचा मजकूर लिहिण्यात आला आहे त्याबाबत सायबर विभागाशी संपर्क साधला आहे. विकिपीडिया आणि संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी जी काही प्रक्रिया करावी लागले ती तातडीने करण्यासाठी सांगितले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्याविषयी असे लेखन अजिबात खपवून घेणार नाही.”
छत्रपति संभाजी महाराज इनको लेकर विकिपीडिया पर लिखी गई विवादित बातों का हम निषेध करते हैं, राज्य सरकार ने आईजी साइबर को विकिपीडिया से बात कर विवादित बातों को हटाकर सही जानकारी प्रेषित करने का आदेश दिया है।
(मीडिया से संवाद | मुंबई | 18-2-2025)#Maharashtra #Mumbai… pic.twitter.com/YRZwOD7hDR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 18, 2025
“विकिपीडियावरील मजकूर काही संबंधित लोकांनाच संपादित करता येतो. ते भारतातून संचालित होत नाही याची आम्हाला कल्पना आहे. त्यासाठी काही नियम आहे. यासाठी काही नियम करता येतील का यावर आम्ही चर्चा करणार आहोत. मात्र सोशल मिडियावर कोणाचे बंधन नसल्याने नियांवली करणे थोडे अवघड आहे. मात्र आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करत आहोत,” असे फडणवीस म्हणाले.
फडणवीसांचा एक आदेश अन् तानाजी सावंतांचा सरकारी लवाजमा गायब
राज्य सरकारकडून मंत्री नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली जात आहे. शिवसेना पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. त्यामध्ये आता कपात करण्यात आली आहे, तानाजी सावंत मंत्री असताना त्यांच्या सुरक्षेसाठी 48 सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र आता ते मंत्री नसल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.
राज्य सरकारने धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातील नेत्यांची देखील सुरक्षा कपात करण्यात आली आहे. दरम्यान तानाजी सावंत यांच्या सुरक्षेसाठी 48 सुरक्षारक्षक तैनात होते. मात्र आता त्यांची सुरक्षेत कपात केली आहे. आता मंत्री नसल्याने त्यांच्याजवळ एकच सुरक्षारक्षक सुरक्षेसाठी तैनात असणार आहे. राज्य सरकारने धोका नसलेल्या आणि मंत्री नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचे धोरण अवलंबवले असल्याचे पाहायला मिळत आहे.