विधानभवनात फडणवीस-दानवे यांच्यात जुगलबंदी (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई:राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. विधानभवनात राज्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान विधानपरिषदेत पर्यावरणीय मुद्द्यावर चर्चा सुरू होती. यावेळेस विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंचत्यात राजकीय जुगलबंदी देखील रंगल्याचे पाहायला मिळाले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधीमंडळात पर्यावरण यावर चर्चा सुरू होती. इंधनाचे वाढणारे दर आणि पर्यावरणाला होणारे नुकसान पाहता राज्य शासनाने ईव्ही गाड्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शासनाची आणि सर्व मंत्र्यांची सर्व वाहने इलेक्ट्रिक असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान याच विषयावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत पर्यावरणाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. राज्यात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. 30 लाख किंमत असलेल्या गाड्यांना राज्यात टॅक्स नाही. तसेच त्यावरील गाड्यांना 6 टक्के टॅक्स लावला जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Maharashtra is becoming the 'EV Manufacturing National Capital'!
Reply in the Maharashtra Legislative Council regarding the transition of private and public transport to EVs, taxes on EVs, and switching of MSRTC buses to alternative fuels…महाराष्ट्र बनत आहे 'ईव्ही… pic.twitter.com/mQEMpbbPaE
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 26, 2025
दानवे-फडणवीस भिडले
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राज्यात शक्य तिथे इलेक्ट्रिक गाड्या घेतल्या जाणार आहेत. आमदारांना व्याज सवलत दिली जात असून ती केवळ ईव्हीसाठी मर्यादित असणार आहे असे फडणवीस म्हणाले. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की आम्हाला, मर्सिडिज घ्यायची आहे. यावर फडणवीस यांनी जोरदार टोला लगावला आहे. शासकीय योजना गरजू लोकांसाठी आहे तर लोभी लोकांसाठी नाही. या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.
ठाकरे गटावर नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं. नंतर अवनती होत गेली त्यानंतर त्यांनी आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहीत नव्हतं. २०१९ ला जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा आम्हाला धन्यता वाटली होती. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला ते पद मिळालं याचा आम्हाला आनंद झाला होता. पण आमदारांना भेटी मिळणार नाहीत. कुठल्याही विषयासाठी भेट मिळणार नाही, दोन ते तीनवेळा आरटीपीसीआर केली तरीही भेट मिळणार नाही. ” असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
“दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं”; ठाकरे गटावर नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत धक्कादायक विधान केले. दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.