Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जत-जामखेडमधील शाळांमध्ये उभारणार कोडींग लॅब; आमदार रोहित पवार यांचा पुढाकार

‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ आणि ‘ॲमेझॉन इंडिया’ यांच्या वतीने कर्जत व जामखेड तालुक्यातील आठवीपर्यंत शाळांमध्ये कोडींग लॅबची उभारणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संगणकीय भाषा शिकवण्यात येणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून या कोडींग लॅबची उभारणी होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2022 | 08:33 PM
कर्जत-जामखेडमधील शाळांमध्ये उभारणार कोडींग लॅब; आमदार रोहित पवार यांचा पुढाकार
Follow Us
Follow Us:

कर्जत/ जामखेड : ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’ आणि ‘ॲमेझॉन इंडिया’ यांच्या वतीने कर्जत व जामखेड तालुक्यातील आठवीपर्यंत शाळांमध्ये कोडींग लॅबची उभारणी करण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या संगणकीय भाषा शिकवण्यात येणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून या कोडींग लॅबची उभारणी होत आहे.

आज लॅब उभारण्यात येणाऱ्या कर्जत तालुक्यातील देशमुखवाडी, मिरजगाव व बाभूळगाव खालसा आणि जामखेड तालुक्यातील चौंडी, सारोळा आणि जामखेड शहरातील उर्दु शाळा आणि सारोळा येथील शाळांना आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांना राखीही बांधण्यात आली.

जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थी प्रामुख्याने सहावी ते आठवीचे विद्यार्थी तसेच शाळेचे शिक्षक यांना या लॅबचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. निवडण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये उभारण्यात येणाऱ्या अमेझॉन कोडींग लॅबमध्ये प्रत्येक शाळेला ८ कॉम्प्युटर सिस्टीम देण्यात येणार आहे. तसेच दोन्ही तालुक्यात कोडींगमध्ये निपुण असलेल्या प्रशिक्षकाचीही नेमणूक करण्यात येणार आहे. या लॅबमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना सी, सी++, जावा (JAVA) आदी संगणकीय भाषा शिकवण्यात येतील.

[read_also content=”भारतमाता की जय च्या जयघोषात निघाली तिरंगा पदयात्रा https://www.navarashtra.com/maharashtra/the-tricolor-padayatra-started-with-the-shouts-of-bharat-mata-ki-jai-nrdm-315725.html”]

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संगणकाविषयी भीती आणि निरक्षरता असते. कोडींग लॅबच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमधील संगणकाविषयीची भीती दूर होऊन त्यांना संगणकाचे ज्ञान मिळेलच परंतु विविध संगणकीय भाषांमुळे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग, गेमिंग, ॲनिमेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये त्यांना भविष्यात नवनवीन संधी मिळतील. कोडींग लॅब उभारणाऱ्या शाळेत इतर शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकही येऊन प्रशिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे या उपक्रमाचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शाळांना होणार आहे. तसेच यामध्ये शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने या कार्यक्रमात सातत्य राहील आणि ते विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करू शकतील.

Web Title: Coding labs to be set up in schools in karjat jamkhed initiative of mla rohit pawar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2022 | 08:33 PM

Topics:  

  • Karjat Jamkhed
  • MLA Rohit Pawar
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
1

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
3

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
4

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.