मारेगाव : दोन दिवसापासून पाण्याचा कहर सुरु असल्याने तालुक्यातील महागाव( Mahagao taluka ) तलाव तुडुंब भरले, सात फूट पाणी. अशातच ८ ऑगस्टच्या रात्री ११ के व्ही बंद पडली. आणि जवळ जवळ १५ गाव अंधारात गेली. मात्र, पावसाची पर्वा न करता जिवाजी बाजी लावून दुसऱ्या दिवशी त्या महागांव तलावतील सात फूट पाणी असलेल्या पोलवर चढून या परिसरातील विद्युत पुरवठा (Power supply)सुरळीत करण्यात आला.
मार्डी ३३ के व्ही (KV) उपकेंद्र मधून ११ के व्ही (KV) कुंभा वहिनी ही सोमवार च्या रात्री ११ वाजेपासून बंद होती. रात्रभर धो धो असल्याने या वाहिनी वरील अंदाजे १५ गावाचा वीज पुरवठा बंद पडला होता. त्यामुळे या भागातील कर्मचारी ११ के व्ही (KV) कुंभा गावठाण फिडर कनिष्ठ अभियंता श्री पवार (Junior Engineer Shri Pawar), कर्मचारी श्री उमेश कनाके, सुरज गमे, अंकुश माडेकर, गिरीश पाचभाई,श्री कातकडे, वैद्य, प्रफुल रासेकर प्रधान तंत्रज्ञ यांनी जीवाची बाजी लावून महागांव तलावात सात फूट पाणी असलेल्या त्या पोलवर चढून विद्युत पुरवठा सुरू केला आहे.
एकीकडे पाऊस, सात फूट तलावात पाणी तरी सुद्धा महावितरण कंपनीचे (Maha distribution company) कर्मचारी उतरले पाण्यात. दरम्यान, फिल्ड वर काम करित असतांना कर्मचाऱ्यांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागली होती. मात्र विज पुरवठा सुरळीत केला, हे विशेष. त्यांचे या कार्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे.