सौजन्य - नवराष्ट्र टीम
बारामती : संत सोपान काका महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे होताच इंदापूर तालुक्याच्या वतीने मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. दरम्यान पिंपळी या ठिकाणी पालखी भोवती मेंढ्यांचे गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडले. दरम्यान बारामतीतील मुक्काम आटोपून पुढे पिंपळी या ठिकाणी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले.
पिंपळी या ठिकाणी पालखी सोहळ्याचे आगमन होताच स्वागत पिंपळी गावच्या माजी सरपंच मंगल केसकर, माजी सरपंच स्वाती ढवाण, माजी उपसरपंच अश्विनी बनसोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व औक्षण करून करण्यात आले. पुढे काही अंतरावर काळुबाई मंदिर परिसरात पालखी रथाला भव्य मेंढ्यांचे गोलाकार रिंगण करुण स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी सतीश केसकर, तानाजी केसकर, जयवंत केसकर, यशवंत केसकर, अर्जुन केसकर, उत्तम केसकर, आप्पा केसकर, नवनाथ केसकर, बिनु केसकर आदी शेतकऱ्यांनी मेंढपाळांच्या मेंढ्यांनी संत सोपानकाका महाराज पालखीला रिंगण केले होते.
पिंपळी गावातील मध्यवर्ती ठिकाणी मारुती मंदिर या ठिकाणी संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा काही तासांसाठी विसावला. तेथील संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. या ठिकाणी गावातील समस्त नागरिक भाविक भक्तांनी संत सोपानकाका पालखीचे दर्शन घेतले. पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या आवडीचा त्यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेला मेनू पिठलं-भाकरी, लोणचे, भात पापड या जेवणाचा त्यांनी आस्वाद घेतला. भोजन कार्यक्रमानंतर पालखीचे सोहळ्याचे प्रमुख चोपदार महाराज आदींचा ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला त्यानंतर पुढे पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना झाला.
गावातील नागरिकांनी पालखी सोहळ्याला साश्रू नायनांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. यावेळी माजी सरपंच मंगल केसकर, स्वाती ढवाण, उपसरपंच अश्विनी बनसोडे, माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते, ग्रामपंचायत सदस्या मीनाक्षी देवकाते, मंगल केसकर, सतीश देवकाते, नितीन देवकाते, संतोषराव ढवाण, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे उपाध्यक्ष सुनिल बनसोडे, रघुनाथ देवकाते आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
भवानीनगरमध्ये पालखी सोहळ्याचे स्वागत
दरम्यान पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर तालुक्यातील भवानीनगर मध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर यांच्यासह इतर मान्यवरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यानंतर व्यापार पेठ तरुण मंडळाच्या वतीने जेवणाची सोय करण्यात आली होती.






