Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिनाक्षी नटराजन यांचा निवडणूक लढण्याचा हक्क हिरावून घेतला, भाजपमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर…; सपकाळांची टीका

नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 05:20 PM
मिनाक्षी नटराजन यांचा निवडणूक लढण्याचा हक्क हिरावून घेतला, भाजपमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर...; सपकाळांची टीका

मिनाक्षी नटराजन यांचा निवडणूक लढण्याचा हक्क हिरावून घेतला, भाजपमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर...; सपकाळांची टीका

Follow Us
Follow Us:

मुंबई : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपा व निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतली परंतु ज्या नोटीस वरून हा अर्ज बाद करण्यात आला होता ती नोटीसच आता तेलंगणातील न्यायालयाने रद्द केली आहे. आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या व नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

 

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी करता करता आता सीटचोरी करू लागला आहे, त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत आला आहे. मिनाक्षी नटराजन यांनी माहिती लपवल्याचे कारण देत अर्ज बाद करण्यात आला पण ज्या फॉर्म २६ वर ही माहिती दिली नाही असा आक्षेप आहे, त्या पानावर अशा पद्धतीचा कोणताच कॉलम नाही मग ती माहिती तरी कशी दिली जाणार, हा प्रश्न आहेच. काँग्रेसने या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली पण निवडणूक प्रक्रिया संपल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला. मुळात जी नोटीस होती ती नोटीसच चुकीची असून नटराजनन यांच्या त्याच्याशी काही संबंध नाही असे स्पष्ट करून तेलंगणातील न्यायालयाने ती नोटीसच रद्द केली आहे. भाजपामध्ये काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी पुन्हा निवडणूक घ्यावी, असेही सपकाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पूर रोखण्यासाठी मोठी तयारी; रेल्वे मार्गांवर पंप, मायक्रो टनेल आणि नालेसफाईचा आढावा

भाजपा महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, म्हणून संपूर्ण कर्जमाफी करून, सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते माजी आमदार अनंत गाडगीळ ही उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? मुंबई-अहमदाबाद मार्गाबाबत मोठी माहिती समोर

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has criticized the bjp and the election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
1

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!
2

PM Narendra Modi Birthday Special: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी भाजपकडून लाल चौकातील ३४ वर्षे जुना ‘तो’ ऐतिहासिक फोटो शेअर!

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
3

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क
4

Begging BJP MLA Net Worth : हातात कटोरा घेत भीक मागणारे भाजपचे अब्जाधीश आमदार! संपत्ती किती कोटींची? नेट वर्थ ऐकून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.