Galaxy S26 Ultra vs Galaxy S25 Ultra: नवा स्मार्टफोन की प्रिमियम फीचर्ससह जुने मॉडेल? तुम्ही कोणाला पसंती देणार?
पहिल्या नजरेत डिस्प्लेमध्ये कोणताही फरक जाणवत नाही. असं सांगितलं जात आहे की, गॅलेक्सी 25 अल्ट्रामध्ये 6.86-इंच पॅनल होता. मात्र S26 अल्ट्रामध्ये 6.89 इंच पॅनल दिला जाणार आहे. डिस्प्ले टेक्नोलॉजीमध्ये बदल केला जाऊ शकतो. तर S25 अल्ट्रामध्ये M13 डिस्प्ले आहे तर S26 अल्ट्रामध्ये नवीन M14 पॅनल दिला जाऊ शकतो. यासोबतच 8-बिट ते 10-बिट रंग अपग्रेड होण्याची शक्यता देखील आहे, ज्यामुळे HDR सामग्रीमध्ये नितळ ग्रेडियंट आणि चांगली रंग डेप्थ मिळेल. सॅमसंग यावेळी थर्ड जनरेशन एंटी रिफलेक्शन कोटिंग देखील घेऊन येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तीव्र ऊन्हात देखील स्क्रीन अगदी स्पष्टपणे दिस शकेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
गॅलेक्सी S25 अल्ट्रामध्ये स्नॅपड्रॅगन 8 ईलीट होता. तर आगामी S26 अल्ट्रामध्ये नवीन स्नॅपड्रॅगन 8 ईलीट जेन 5 दिला जाऊ शकतो. नवीन प्रोसेसर जास्त एफिसिएंट असणार आहे. यामध्ये जास्त AI फीचर्स दिले जाऊ शकतात. यामधील गेमिंग आणि हेवी अॅप्स अतिशय स्मूथ असणार आहे. एस 25 अल्ट्रामध्ये 9.6 जीबीपीएस आहे तर एस 26 अल्ट्रामध्ये 10.7 जीबीपीएस असू शकतो.
गॅलेक्सी S26 Ultra मध्ये 200MP HP2 सेंसर असू शकतो, मात्र अर्पचर मोठा असणार आहे. S26 अल्ट्रामध्ये f/1.4 असू शकतो, ज्यामुळे लो लाईट फोटोग्राफी अधिक चांगली होऊ शकते. तर गॅलेक्सी S25 Ultra मध्ये 200 MP मुख्य सेंसर, 50 MP अल्ट्रा-वाइड, 50 MP पेरिस्कोपिक 5x आणि 10 MP 3x टेलीफोटोसह क्वाड-लेंस सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यामध्ये 12 MP फ्रंट कॅमेरा आहे.
आगामी फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. तर फोनमध्ये 60W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 25W वायरलेस चार्जिंग सपोर्ट दिला जाण्याची शक्यता आहे. लिक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, गॅलेक्सी S26 Ultra ची किंमत S25 Ultra पेक्षा कमी असणार आहे.






