Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांची काँग्रेस पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची मोठी कारवाई

काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत असून निवडणुकीतून अर्ज माघारी घेतल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सकपाळ यांनी हि माहिती दिली आहे. साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल या काँग्रेस उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Jun 05, 2026 | 05:20 PM
Congress suspends Sahebrao Kamble, Congress suspends Shailesh Aggrawal, Vidhan Parishad Election, Harshvardhan Sakpal,

Congress suspends Sahebrao Kamble, Congress suspends Shailesh Aggrawal, Vidhan Parishad Election, Harshvardhan Sakpal,

Follow Us
Follow Us:

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. गुरुवारी (४ जून) विधान परिषद निवडणुकीतुन अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी येत असून निवडणुकीतून अर्ज माघारी घेतल्याच्या कारणावरून दोन उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धण सपकाळ यांनी हि माहिती दिली आहे. साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल या काँग्रेस उमेदवारांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात १७ विधान परिषद मतदारसंघांसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. आधी जागावाटपावरून आणि आता उमेदवारीवरून जवळपास सगळ्याच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या. यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सर्वानाच मोठा धक्का बसला.

मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे काँग्रेस पक्षाचे यवतमाळचे उमेदवार श्री. साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार श्री. शैलेश अग्रवाल यांना काँग्रेस पक्षातून निलंबीत करण्यात येत असून त्यांचे पक्ष सदस्यत्व रद्द… pic.twitter.com/hDkQLVSPKH — Maharashtra Congress (@INCMaharashtra) June 5, 2026

या दोन्ही जागांवरून काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षातील वरिष्ठांना विश्वासात न घेता उमेदेवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही कारवाई केली असून या दोघांचे पक्ष सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची मोठी कारवाई

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हि मोठी कारवाई केली असून काँग्रेसच्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून त्यांनी याची माहिती दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी काल उमेदवार अर्जमाघारी बाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, “भारतीय जनता पक्षाची सर्वत्र सत्ता असतानाही आणखी सत्ता हवी या सत्तेच्या हव्यासापोटी ते लोकशाही मुल्ये पायदळी तुडवत आहेत. विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपाने नैतिकता गुंडाळून सर्व हातखंडे वापरले आहेत. भाजपाला लोकशाही नको आहे, ‘इलेक्शन सिस्टिम’ नाही तर ‘नॉमिनेशन सिस्टिम’ भाजपाला हवी आहे.”

बिनविरोधची धडपड, माघारनाट्य आणि १५० कोटींचा घोडेबाजार, संजय राऊतांचे महायुतीवर गंभीर आरोप; भाजपचा पलटवार

ते पुढे म्हणाले, “विधान परिषदेच्या सध्या सुरु असलेल्या निवडणुकीचा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून गेलेले प्रतिनिधी असतात, हा मर्यादीत मतदार असतो. पण या निवडणुकीतही सत्ताधारी महायुतीकडून ‘पैसा फेक तमाशा देख’, चा खेळ खुलेआमपणे सुरु आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी सत्ताधारी भाजपा महायुतीने सत्ता, पैसा या सर्व तंत्राचा गैरवापर केला आहे. घातपात, विश्वासघात, पैशाचे प्रचंड वाटप करण्यात आले आहे. या निवडणुकीला सत्ताधारी महायुती अत्यंत विकृत पद्धतीने सामोरे जात आहे, हे चित्र लोकशाहीसाठी अजिबात चांगले नाही,” अश्या शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीआधीच मविआला धक्का, १७ पैकी ५ जागांवर महायुती बिनविरोध

Web Title: Congress suspends sahebrao kamble and shailesh aggrawal for withdrawing nomination from vidhan parishad election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 05:19 PM

Topics:  

  • Congress
  • Harshvardhan Sapkal
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल
1

‘मेरी डिग्री का क्या?’ अभियानातून मुंबई युवक काँग्रेसचा बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला सवाल

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

Amit Shah Maharashtra Visit : अमित शहांचा महाराष्ट्र दौरा की ‘मेवा संकल्प अभियान’? हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.