पाचगणी : महाबळेश्वरमध्ये अनेक पर्यटक घोड्यांवरुन रपेट मारण्याचा आनंद लुटतात. मात्र, या घोड्यांमुळे सध्या महाबळेश्वरमध्ये एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
महाबळेश्वरच्या वेण्णा तलावाजवळ पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या घोड्यांची विष्ठा महाबळेश्वरमध्ये वर्षानुवर्षे रोगराई पसरवत असल्याचे एका अभ्यासातून समोर झाले आहे. ही विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्याने अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड असे आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालामुळे संपूर्ण महाबळेश्वर व महाराष्ट्रातल्या महाबळेश्वर पाचगणी जाणाऱ्या पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थे’च्या ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएसडी) या संस्थेच्या माध्यमातून ‘आरोग्य जोखीम मूल्यांकन संशोधन प्रकल्प’ हाती घेण्यात आला होता. या प्रकल्पासाठी महाबळेश्वरची निवड करण्यात आली. संस्थेच्या प्रा. डॉ. प्रीती मस्तकार यांच्या नेतृत्वाखाली निखिल अटक, दिशा सावंत, रोहिणी सातपुते, सूरज भोळे आणि विनित दुपारे यांनी या प्रकल्पावर काम केले. महाबळेश्वरमध्ये अनेक वर्षांपासून स्थानिक रहिवासी व पर्यटकांना अतिसार, अन्नविषबाधा, श्वसनाचा तीव्र संसर्ग, बुरशीजन्य संसर्ग आणि टायफॉइड या विकारांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे कारण शोधल्यानंतर घोड्यांची विष्ठा पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांत मिसळत असून, त्याद्वारे ती नागरिकांच्या पोटात जाऊन गंभीर आजार होत असल्याचे दिसून आले आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वेण्णा नदीच्या उगम स्थान असणाऱ्या जागेवर वेण्णा लेक तलाव बांधला आहे मोठ्या प्रमाणात या लेख मध्ये पाण्याचा साठा होत असतो. वसन वर्ष या परिसरात हॉर्स रायडिंग होत आहे. इंग्रजांच्या काळापासून या परिसरात हॉर्स रायडिंग ला विशेष महत्त्व आहे. सध्या या परिसरात हजारो घोडेस्वार परिसरात हॉर्स रायडिंगवर आपली उपजीविका करत असतात. मात्र नव्याने आलेल्या या अहवालामुळे घोडे चालक-मालक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून त्यांच्या रोजगार आणि उपजीविकेचा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण झाला आहे. वेण्णा तलावातून पाचगणी येथील प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा केला जातो. वर्षानुवर्ष या तलावातून प्राधिकरणाच्या माध्यमातून नळ पाणीपुरवठा योजना संपूर्ण पाचगणी शहरासह परिसरात पाण्याचा पुरवठा केला जातोय. मात्र नेमकी पाण्यात दूषितिकरण कशामुळे झाले याचा अहवाल भलेही गोखले इन्स्टिट्यूटने दिला असला तरी याच तलावातील पाण्यात परिसरातील असणाऱ्या पंचतारांकित हॉटेलचे ड्रेनेज आणि सांडपाणी जात असल्याचे धक्कादायक माहिती येथील घोडागाडी चालक-मालक व घोडेमालकांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यामुळे तलावातील पाणी नेमके घोड्यांमुळे दूषित झाले आहे की, अन्य काही कारणांमुळे याचा तपासणीचा अहवाल देखील सादर व्हावा, अशी मागणी घोडे मालक-चालक यांनी केली आहे.
वेण्णा लेक परिसरातील पंचतारांकित हॉटेलचे सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी याच तलावात सोडले जात असल्याची माहिती स्थानिक सांगतात. त्यामुळे संबंधित हॉटेल्स वर एसटीपी चे कोणतेही प्लांट अवेलेबल नाहीत या हॉटेलमधून निघणारे सांडपाणी व ड्रेनेजचे पाणी याच तलावात सोडले जात आहेत त्यामुळे दूषित पाण्यात आणखीन भर होत आहे प्रदूषण विभाग व प्रदूषण मंडळाने व संबंधित नगरपालिकेने तलावाच्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व हॉटेलची सांडपाण्याची तपासणी करावी अशी मागणी होत आहे.