कणकवली येथील एका कॉलेजच्या विद्यार्थिनीची सहल रेल्वेने मुंबई येथे जात होत्या. त्या युवती प्रवासात १९ जानेवारी रोजी अंताक्षरी खेळत असताना जय श्रीराम…बोल असलेले गाणे गात असताना एका युवकाने सदर गाणे बंद पाडण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. नंतर संबंधित त्या युवतींवर धार्मिक दबाव निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्व युती कणकवली परिसरातल्या असल्याने कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली. या कॉलेज युवतींवर हिंदू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे वेंगुर्ले, सावंतवाडी पाठोपाठ कणकवलीतही वादाची ठिणगी पडली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाले होते. यावेळी जोरदार जय श्रीराम, प्रभू रामचंद्र की जय.. अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी गोट्या सावंत, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, समीर नलावडे, प्रज्ञा ढवण, अण्णा कोदे, निखिल आचरेकर, समीर प्रभूगावकर, सुभाष मालडकर, प्रदीप गावडे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.