करुणा शर्मा यांची रूपाली चाकणकर यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया/टीम नवराष्ट्र)
Dhananjay Munde: राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. करुणा शर्मा यांनी दरमहा 15 लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. दरम्यान कोर्टाकडून धनंजय मुंडेंना नोटीस पाठवली आहे, त्यावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शपथपत्रात माहिती लपविल्याबद्दल कोर्टाने धनंजय मुंडे यांना कोर्टाने नोटिस बजावली आहे. त्यावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, “2024 च्या निवडणुकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दाखल केले होते, त्यामध्ये माझ्या मुलांची माहिती देण्यात आली होती. मात्र माझ्याबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. त्यासाठी कोर्टाने त्यांना नोटिस बजावली आहे. दरम्यान 24 तारखेला कोर्टात मी हजर राहणार आहे. ”
“रूपाली चाकणकर म्हणत आहे की त्यांनी मला न्याय मिळवून दिला. मात्र ज्यावेळेस माझ्यावर खोट्या केसेस दाखल झाल्या. बीडमध्ये राहत होते तेव्हा एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी 6 एफआयआर दाखल केल्या गेल्या. कलेक्टर ऑफीसमध्ये वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि काही घाणेरडी कृत्य केली. या गोष्टी मी त्यांना सांगितल्या होत्या. मात्र त्यांनी आजवर काही कारवाई केली नाही. ”
पुढे बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, “रूपाली चाकणकर महिला आयोग हे तुमच्यासाठी एक पद आहे. मात्र महाराष्ट्रातील महिलांसाठी ते एक न्यायालय आहे. त्यांना वाटत असेल आम्ही न्याय देऊ शकतो पण त्या आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत. त्या माझ्यासोबतचा फोटो शेअर करून सांगतात मला न्याय मिळवून दिला मात्र त्यांनी काही केले नाही. भाजप हा मोठा पक्ष आहे. मला वाटत नाही की देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडेंना वाचवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला न्यायाची अपेक्षा आहे.”
कोर्टाच्या निकालानंतर करुणा शर्मांची प्रतिक्रिया
कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, ‘कोर्टाने पहिली बायको म्हणून मला मान्यता दिली आहे. मी लढा दिला आहे. यासाठी मोठी किंमत चुकवली आहे. गेले तीन वर्ष मी लढा देत आहे. मला करुणा शर्मा नाही तर मला करुणा मुंडे म्हणा. मी न्यायाधीश, कोर्ट आणि माझे वकील यांचे मनापासून आभार मानते.
कोर्टाने 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला. त्यावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, ‘कोर्टाच्या ऑर्डरवर मी समाधानी नाही. आम्हाला महिन्याच्या खर्चासाठी 15 लाख महिन्याला हवेत. त्यामुळे मी हायकोर्टात दाद मागणार आहे.’ कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.