Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीची मागणी; साताऱ्यात संघटनांचे तीव्र आंदोलन

गोविंद पानसरेंच्या पुस्तकावर बंदी घालण्यासाठी आता आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. इतिहासाचे विकृतीकरण या पुस्तकात असून यावर कायमस्वरूपी बंदी घालण्याची आंदोलन करून मागणी होत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 27, 2026 | 09:56 PM
शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी मागणी

शिवाजी कोण होता पुस्तकावर बंदी मागणी

Follow Us
Follow Us:
  • गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता पुस्तकाचा वाद 
  • साताऱ्यात तीव्र आंदोलन 
  • पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी 
सातारा: गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा तसेच इतिहासाचे विकृतीकरण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.

आंदोलनानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे पुस्तकाची विक्री व वितरण तात्काळ थांबवावे, संबंधित लेखक व प्रकाशकांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व १९६ अंतर्गत गुन्हे नोंदवावेत, तसेच पुस्तकाच्या डिजिटल आवृत्तींवर सायबर कायद्यांनुसार निर्बंध आणावेत, अशी मागणी करण्यात आली.

शिवाजी कोण होता’ पुस्तकावरुन वाद! पानसरेंचे कसे हाल झाले तसे तुझे..: MLA संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी

कोणी केले आंदोलन?

हिंदू जनजागृती समितीच्या भक्ती डाफळे यांनी या पुस्तकातून शिवाजी महाराजांच्या कार्याचा अपमान झाल्याचा आरोप केला. इतिहासाचे चुकीचे चित्रण करून समाजात गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदू महासभेचे अधिवक्ता दत्तात्रय सणस यांनी राष्ट्रपुरुषांचा अवमान सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत कठोर कारवाईची मागणी केली.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गुरूराज रसाळ यांनी शिवचरित्राची विकृती करणाऱ्या लिखाणाला विरोध कायम राहील, असे सांगितले. तसेच, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनावणे यांनी या पुस्तकामुळे तरुण पिढीमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची चिंता व्यक्त केली. विश्व हिंदू परिषदेचे विजय गाढवे यांनी राष्ट्रपुरुषांच्या सन्मानाबाबत कोणतीही तडजोड मान्य केली जाणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

या आंदोलनात विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

काय आहे वाद?

कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या जुन्या पुस्तकातील मजकूर आणि शीर्षकावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या पुस्तकात इतिहासाची मोडतोड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून प्रतिमा मलीन करत असल्याचा आरोप केला आहे, तर पुरोगामी संघटनांनी हे पुस्तक छत्रपतींचा ‘लोकराजा’ म्हणून इतिहास मांडत असल्याचे सांगून यावर बंदी घालण्यास विरोध केला आहे. दरम्यान हा वाद वाढीला लागला आहे. 

Chhatrapati Shivaji Maharaj : युद्धच नाही तर ‘या’ कारणांमुळे शिवरायांना रयतेचा राजा म्हणायचे, याचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का ?

Web Title: Demand for ban on the book shivaji kon hota intense protests by organizations in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का
1

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमवर दुःखाचा डोंगर; लेखक विजय कुमार राख यांचे अपघाती निधन, मनोरंजन क्षेत्राला धक्का

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
2

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी
3

Tukaram Mundhe: महाराष्ट्रात मोठा घोळ! 11 रुपयांचा IV Set 325 ला विक्री, तुकाराम मुंडेंनी केंद्रीय हस्तक्षेपाची केली मागणी

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
4

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.