• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Demand Of Ban On Gutkha Pan Masala And Tobacco In Maharashtra Nrsr

राज्यात गुटखा, तंबाखूसारख्या पदार्थांच्या विक्रीवर हवी बंदी, गुटखा माफियांसाठी एसआयटीची उच्च न्यायालयात मागणी

गुटखा, पान मसाला, फ्लेवरयुक्त सुपारी आणि तंबाखूसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर अंकुश न ठेवल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

  • By साधना
Updated On: Dec 29, 2022 | 05:51 PM
ban on gutkha pan masal and tobacco
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मयुर फडके,मुंबई: राज्यातील गुटखा (Gutkha), पान मसाला आणि फ्लेवरयुक्त सुपारी, तंबाखू या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर बंदी (Ban On Tobacco) आणा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या हानिकारक पदार्थांची विक्री करणाऱ्या गुटखा माफियांवर कारावाई करण्यासाठी राज्य सरकारला विशेष तपास पथक (एसआयटी) (SIT) स्थापन करण्याचे आदेश द्या, अशी मुख्य मागणीही याचिकेत करण्यात आली असून त्यावर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

मुंबईच्या वसई उपनगरातील रहिवासी असलेले आणि सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अशी ओळख असलेले धमेंद्र यांनी वकील नरेंद्र डुबे यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. गुटखा, पान मसाला, फ्लेवरयुक्त सुपारी आणि तंबाखूसारख्या प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीवर अंकुश न ठेवल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला असून त्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हे भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ चे स्पष्टपणे उल्लंघन असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

याचिकेत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव, पोलीस महानिरीक्षक, मुंबई पोलीस आयुक्त, आणि एफडीए आयुक्त इत्यांदीना प्रतिवादी केले आहे.

कॅन्सरचे प्रमाण चितांजनक
राज्यात गुटखा, पान मसाला, चवदार सुपारी आणि फ्लेवरयुक्त तंबाखूसारख्या प्रतिबंधित उत्पादनांच्या विक्री आणि वितरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत असून राज्यात कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होत असून कॅन्सर होण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

तंबाखू अनेक रोगांसाठी कारणीभूत
तंबाखू उत्पादनाचे कोणतेही फायदे नाहीत परंतु मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. तंबाखूमुळे फुफ्फुसाचा आणि तोंडाचा ९० टक्के कर्करोग होतो. तंबाखूशी संबंधित आजारांची यादी खूप मोठी असून हृदयविकार, ब्राँकायटिस, दमा, नपुंसकत्व, जन्मदोष यांचा समावेश आहे. तंबाखूच्या धुरात ७०० पेक्षा जास्त हानिकारक रसायने आणि निकोटीन, टार आणि इतर किरणोत्सर्गी घटकांसह ६९ कार्सिनोजेन्स असतात. सिगारेटच्या धुरात अमोनिया, आर्सेनिक, कार्बन मोनोऑक्साइड, हायड्रोजन सायनाइड, डीडीटी, फॉर्मल्डिहाइड इत्यादी घटकांमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवतात, असेही याचिकेत म्हटले आहे. तसेच भारतातील तंबाखू नियंत्रण, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यूएसए आणि डब्ल्यूएचओ यांच्या संयुक्त अहवालानुसार तंबाखूचा वापर जगातील सार्वजनिक आरोग्यासाठी एक गंभीर आव्हान असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

सरकारच्या तिजोरीवर परिणाम
प्रतिबंधित उत्पादनांच्या विक्री आणि वितरणावर सरकारचे अंकूश नसल्यामुळे राज्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात महसूलावरही परिणाम झाला असून हवालासारख्या बेकायदेशीर व्यवहारांमध्ये तसेच आर्थिक अफरातफरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Web Title: Demand of ban on gutkha pan masala and tobacco in maharashtra nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2022 | 05:49 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.