Deur Truck Acciden
देऊर हे परिसर महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र तसेच प्रसिद्ध देवस्थान असल्याने या बसस्थानकावर दररोज शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, भाविक आणि प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. सुदैवाने, हा अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने बसस्थानक परिसरात गर्दी नव्हती. जर हाच अपघात ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच दिवसा घडला असता, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असती, अशी भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.
सध्या सातारा-लोणंद मार्गाचे रुंदीकरण झाले आहे यामुळे यावर वाहने भरधाव वेगाने जात आहेत, वाहनांची प्रचंड गती आणि वारंवार होणारे छोटे-मोठे अपघात पाहता, वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर देऊर बसस्थानक परिसरात तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर), स्पीड कॅमेरा आणि योग्य सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी स्थानिक देऊर ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास राज्यमार्गावर तीव्र स्वरूपाचा ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडण्याचा इशारा देऊर ग्रामस्थांनी दिला आहे.






