Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : विकासकामाला गती; उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव नव्या पुलबांधणीची स्थानिकांची मागणी

तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 06, 2025 | 02:05 PM
Karjat News : विकासकामाला गती; उल्हास नदीवरील दहिवली मालेगाव नव्या पुलबांधणीची स्थानिकांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:
  • विकासकामाला गती
  • खराब रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी
  • उल्हास नदीवरील नव्या पुलबांधणीची स्थानिकांची मागणी
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर दहिवली मालेगाव येथे असलेली कमी उंचीच्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात येत आहे. 25 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या या नवीन पुलाच्या कामाला गती मिळाली आहे.मात्र या पुलाचे काम मार्च पूर्वी पूर्ण करावे आणि धामोते ते कोदिवले या भागातील खराब रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक रिक्षा चालक यांनी केली आहे.

माथेरान नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या उल्हास नदीवर पूल आहे.दहिवली मालेगाव येथे असलेला जुना पूल 40वर्षे पूर्वी बांधण्यात आलेला आहे. त्यावेळी बांधलेला पूल हा कमी उंचीचा असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या पुलावरून महापुराचे पाणी वाहून जाते आणि त्यामुळे पुलावरून होणारी वाहतूक बंद होते.त्यामुळे उल्हास नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षे सुरु आहे.त्यानुसार राज्य सरकारकडून नवीन पूल उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळावी आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या कडून या पुलाची मागणी गेली पाच वर्षे सरकारकडे होत होती.या पुलाची गरज असताना आणि दरवर्षी पावसाळ्यात हा पूल चार ते पाच वेळा पाण्याखाली जात असल्याने पुलाचे बांधकाम तकलादू बनले आहे.यावर्षी तर पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती.

2024 पासून या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून ठेकेदार कंपनीसाठी हा पूल बांधला जात आहे की वाहने आणि जनतेसाठी? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरु असताना देखील बांधकाम विभाग संबंधित कामाचा ठेका घेणारे ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याची तसदी घेत नाही. त्याचवेळी पुलाचे कामासाठी 18 महिन्यांचा कालावधी संपून गेला आहे. तरी देखील या पुलाचे अर्धे काम देखील पूर्ण झालेले नाही. पुलाचे बांधकाम मंदगतीने सुरू असून स्थित उल्हास नदीवरील या पुलाची झाली आहे.

कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर वन विभागाने रस्ता अडवला ; वनजमीन मिळवण्यासाठी बांधकाम खात्याचा असहकार

सार्वजनिक बांधकाम खात्याचे दहिवली मालेगाव पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर नियंत्रण नसल्याने मागील दोन वर्षापासून सुरू आहे. नवीन पुलाची उंची ही जुन्या पुलाच्या उंचीपेक्षा किमान दहा फूट उंच बनविण्यात येत आहे. त्याचवेळी जुन्या पुलावरून पावसाळ्यात उल्हास नदीला महापूर आल्यानंतर किमान पाच फूट उंचीवरून पाणी वाहून जात असते. त्यावेळी भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पुलाची उंची अधिक ठेवण्यात येत आहे. त्यात अनेक महिने रखडलेल्या या पुलाचे काम पुन्हा सुरू झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दहिवली मालेगाव पुलाचे काम जनतेसाठी सुरु आहे की, ठेकेदासाठी असा प्रश्न आम्हला पडला आहे. या पुलाचे बांधकाम सुरु होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.पुलाचे खांब देखील उभे करून घेण्यात बांधकाम खाते निष्प्रभ ठरले आहे, असं स्थानिक रिक्षाचालक श्रावण जाधव यांनी सांगितलं आहे.

Karjat News : कर्जतमध्ये निवडणूक यंत्रणा सज्ज ; शहरात मोठा पोलीस बंदोबस्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: दहिवली–मालेगाव येथे नवीन पूल का बांधला जात आहे?

    Ans: उल्हास नदीवरील विद्यमान पूल सुमारे 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि तो कमी उंचीचा आहे. पावसाळ्यात दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो, त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सुरक्षित वाहतुकीसाठी आणि महापुराचा धोका टाळण्यासाठी नवीन उंच पूल आवश्यक झाला.

  • Que: जुन्या पुलाची मुख्य समस्या काय आहे?

    Ans: कमी उंचीचा बांधकाम महापुरात वर्षातून 4–5 वेळा पाणी पुलावरून वाहतं अवजड वाहनांना बंदी घालण्याची वेळ बांधकाम जुने व कमकुवत झाल्यामुळे धोका वाढलेला

  • Que: नवीन पुलाची उंची किती ठेवली जात आहे?

    Ans: नवीन पूल हा जुन्या पुलापेक्षा सुमारे 10 फूट अधिक उंच बांधला जात आहे, जेणेकरून भविष्यात पावसाळ्यात नदीची पातळी वाढली तरी पूल सुरक्षित राहील.

Web Title: Development work to accelerate locals demand construction of new dahivali malegaon bridge over ulhas river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 02:05 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Raigad ZP Election :  जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ
1

Raigad ZP Election : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी आमदार महेंद्र थोरवेंच्या हस्ते फुटला प्रचाराचा नारळ

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
2

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण
3

ZP Election 2026 : करमाळ्यात माघारीनंतरच स्पष्ट होणार सत्तेचे गणित; जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक बहुपक्षीय 308 उमेदवार रिंगण

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा
4

Ahilyangar News: संगमनेरमध्ये कामगार रुग्णालयांना मंजुरी! आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.