Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

२९ महानगरपालिकांच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस हे केवळ एक नेते नसून ते विजयाचे 'मॅजिक मॅन' ठरले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 16, 2026 | 10:05 PM
CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?
Follow Us
Close
Follow Us:

 

  • महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’
  • भाजप ‘सिकंदर’!
  • कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?
Municipal Election Result 2026 News Marathi: “मला विश्वास आहे की आपण आपलाच विक्रम मोडू!” निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केलेला हा विश्वास आज सत्यात उतरला आहे. २९ महानगरपालिकांच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस हे केवळ एक नेते नसून ते विजयाचे ‘मॅजिक मॅन’ ठरले आहेत. २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येऊनही फडणवीसांच्या ‘चाणक्यनीती’ पुढे त्यांचे भावनिक आवाहन फिके पडले. या विजयाने ५४ वर्षीय देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली आणि ‘धुरंधर’ नेते म्हणून प्रस्थापित केले आहे.

ठाकरे कुटुंबाचे तीन दशकांचे वर्चस्व मोडीत!

फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीवर (BMC) गेल्या ३० वर्षांपासून असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सत्तेला फडणवीसांनी सुरुंग लावला आहे. २०१७ पर्यंत शिवसेनेचा ‘धाकटा भाऊ’ असलेला भाजप, आज मुंबईत ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत आला असून, मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे.

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

फडणवीस: एक लढाऊ आणि धोरणी नेतृत्व

२०१९ मध्ये सत्ता गमावल्यानंतरही फडणवीस डगमगले नाहीत. उलट त्यांनी अधिक ताकदीने पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केले.  २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून पक्षाची ताकद तळागाळात मजबूत केली. मुंबई आणि उपनगरांमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी शांतपणे पाया रचला, ज्याचे फळ आज निकालातून मिळत आहे.

मराठी मतपेढीला नवी दिशा

फडणवीसांनी केवळ भाजपची पारंपरिक गुजराती आणि उत्तर भारतीय मतपेढी टिकवून धरली नाही, तर त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या ‘मराठी कार्ड’लाही छेद दिला. स्वतःला एक सक्षम ‘मराठी हिंदू’ नेता म्हणून सादर करत, त्यांनी मुंबईचा पुढचा महापौर मराठी असेल, हे दिलेले वचन पाळले. यामुळे दक्षिण भारतीय आणि मध्यमवर्गीय मराठी मतदारांनीही भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिली.

२०२९ च्या विधानसभा निवडणुकीची नांदी

या विजयाने फडणवीसांनी केवळ बीएमसीच जिंकली नाही, तर आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग सुकर केला आहे. अशक्य वाटणारे ‘मिशन मुंबई’ फत्ते करून त्यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Web Title: Devendra fadnavis dhurandhar of mahayuti victory maharashtra municipal election results 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 10:05 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • CM Devendra Fadanvis
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं
1

‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
2

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

BMC Muncipal Election Result 2026: ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण?
3

BMC Muncipal Election Result 2026: ठाकरेंचा २५ वर्षांचा गड ढासळला? मुंबईचा महापौर २६ जानेवारीनंतरच निवडला जाणार; काय आहे कारण?

आकडे फिरले! भाजपाच्या हातातून मुंबई महापालिका जाणार? मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
4

आकडे फिरले! भाजपाच्या हातातून मुंबई महापालिका जाणार? मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.