Photo Credit- Social Media
मुंबई: महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था (मित्र) या आयोगाच्या उपाध्यक्षपदी बिल्डर अजय अशर यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत अजय अशर यांना संस्थेच्या नियमित मंडळावरून हटवले आहे. यामुळे उपमुख्यमंत्री शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
ठाण्यातील बडे बिल्डर आणि राजकीय जवळीक
अजय अशर हे ठाण्यातील प्रसिद्ध बिल्डर असून, एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या किसननगर मतदारसंघात त्यांनी अनेक प्रकल्प उभारले आहेत. पूर्वी काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज शिंदे यांचे मित्र असलेल्या अशर यांनी 2000 नंतर एकनाथ शिंदेंशी जवळीक वाढवली. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे शिंदे सभागृह नेतेपदी पोहोचले, त्याच काळात अशर यांनी त्यांच्यासोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले.
Devendra Fadnavis: पंधरा दिवसांत जोतिबा प्राधिकरणास मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाचे प्रकल्प आणि शिंदेंची साथ
एकनाथ शिंदे आमदार झाल्यानंतर अशर यांची ही जवळीक अधिक दृढ झाली. ठाण्यातील मोठ्या विकास आणि पुनर्विकास प्रकल्पांमध्ये अशर यांना प्राधान्य दिले जाऊ लागले. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी अशर यांची ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, आता फडणवीस सरकारने हा निर्णय बदलत अशर यांना संस्थेच्या मंडळातून वगळले आहे.या निर्णयाचे राजकीय अर्थ लावले जात असून, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाची नवी झलक यामध्ये पाहायला मिळते.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिंदे यांच्या कार्यकाळातील काही महत्त्वाचे निर्णय फडणवीस सरकारने बदलले असून, आता आणखी एक मोठा निर्णय घेत ‘मित्र’ संस्थेच्या नियमित मंडळातून अजय अशर यांना हटवण्यात आले आहे.
Today Horoscope: या राशीच्या लोकांना मालव्य राजयोगामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता
त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील आणि राजेश क्षीरसागर यांची नव्याने ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच, मुख्य सचिवांसह इतर महत्त्वाच्या सिंचन संचालक पदांसाठीही नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. हा बदल एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात असून, या निर्णयाने राज्यातील सत्ता समीकरणांमध्ये नवीन घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.