Photo Credit- Team Navrashtra
Dhananjay Munde Health News Marathi : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याचदरम्यान गेल्या काही महिन्यांपासून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे आजार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची प्रकृती बिघडली असून याबद्दल त्यांनी नुकतेच X माधम्यावर याबाबतीत एक पोस्ट शेअर केली. याचदरम्यान धनंजय मुंडे यांनी प्रकृतीसंदर्भात अपडेट दिली असून धनंजय मुंडे बीडमधील कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. कॅबिनेट बैठकांना उपस्थित नव्हते. याचे कारण त्यांनी आपल्या पोस्टद्वारे सांगितले होते.
धनजंय मुंडे यांनी X वर पोस्ट करत म्हटलं की, ” माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हा पासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
त्याच दरम्यान मला…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 20, 2025
त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही.
याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय श्री.देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे. लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजु होईल…” असं धनजंय मुंडे यांनी x वर पोस्ट करत म्हटलं आहे.
बेल्स पाल्सीला चेहऱ्याच्या एका बाजूचा पक्षाघात असेही म्हणतात. बेल्स पाल्सी हा चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणामुळे होणारा तात्पुरता पक्षाघात आहे. हे सहसा तेव्हा घडते जेव्हा तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंवर नियंत्रण ठेवणारे स्नायू सुजतात किंवा आकुंचन पावतात. असे होण्याचे कोणतेही स्पष्ट कारण नाही. बेल्स पाल्सी झालेल्या व्यक्तीला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो. डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या किंवा अर्ध्या बंद राहतात.
जेव्हा तुम्हाला सर्दी, कानाचा संसर्ग आणि डोळ्यांचा संसर्ग होतो तेव्हा बेल्स पाल्सी बहुतेकदा एक ते दोन आठवड्यांत विकसित होतो. बेल्स पाल्सी चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना प्रभावित करते तेव्हा हे अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये घडते.