Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Farmers :  21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा

Dharashiv Farmers : धाराशिव जिल्ह्यातील तब्बल २१ हजार शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १८३.८५ कोटी रुपयांचा कर्जमाफीचा निधी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 06:52 PM
अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

अकोल्यातील शेतकऱ्यांना दोन कोटींची मदत; मदतीच्या रकमेतून कर्जवसुली नको, शासनाचे बँकांना स्पष्ट आदेश

Follow Us
Follow Us:
  • २१ हजार ७९३ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम
  • १८३ कोटी ८५ लाखांची कर्जमाफी जमा
  • तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन
Dharashiv Farmers : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील २१ हजार ७९३ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर तब्बल १८३ कोटी ८५ लाख ८९ हजार ९५६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख ३६ हजार ३६ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर २४ ऑगस्ट रोजी एकूण ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. ( Dharashiv Farmers ) 

Dharashiv News: धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

धाराशिव जिल्ह्यातील पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या ज्या पात्र शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणीकरण झालेले नाही, त्यांनी ते तातडीने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनाकडून कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. तसेच उर्वरित पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ७ शेतकऱ्यांना लाभ

२४ ऑगस्टच्या लाभात धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ३९८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर ८ कोटी ३८ लाख ३९ हजार ७७३ रुपये जमा झाले आहेत. यापूर्वी जिल्ह्यातील १२ हजार २१४ लाभार्थी शेतकऱ्यांना १०५ कोटी ८६ लाख रुपयांचा लाभ मिळाला होता. नवीन २१ हजार ७९३ लाभार्थ्यांच्या कर्जमाफीची भर पडल्याने धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३४ हजार ७ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७२ लाख ४४ हजार ६६० रुपयांचा लाभ मिळाला आहे.

९७ हजार ८७३ शेतकऱ्यांचा योजनेत समावेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ ला २ जून रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतर १५ जुलैच्या शासन निर्णयानुसार योजनेच्या काही निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली. योजनेच्या कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता (OTS) घटकांच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील ३० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, १२ राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर खासगी बँकांसह ५३ बँकांनी सुमारे ३२ लाख कर्जखात्यांची माहिती महा-आयटीच्या पोर्टलवर अपलोड केली. यात धाराशिव जिल्ह्यातील ९७ हजार ८७३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

२५ जुलै रोजी योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी राज्यातील सुमारे १६.९६ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली. या यादीत धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ४६ हजार ९१५ थकबाकीदार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्यांना खरीप कर्जाचे वाटप

कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. योजनेसाठी २२ आणि ३० जुलैच्या शासन निर्णयांनुसार ७ हजार १ कोटी रुपये, तर १९ ऑगस्टच्या शासन निर्णयानुसार आणखी ४ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेसाठी राज्य शासनाने एकूण ११ हजार १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

दरम्यान, पहिल्या यादीत नाव असूनही आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरणानंतर त्यांच्या कर्जखात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Dadar Dindi Sohala 2026: दादरमध्ये सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न; वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह!

Web Title: Dharashiv farmers get 183 crore loan waiver amount in bank accounts marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Dharashiv
  • Farmer Loan Waiver

संबंधित बातम्या

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांनो, कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर! ‘इतक्या’ शेतकऱ्यांचा समावेश; तुमचंही नाव असेल तर लगेच करा ‘हे’ काम
1

Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांनो, कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर! ‘इतक्या’ शेतकऱ्यांचा समावेश; तुमचंही नाव असेल तर लगेच करा ‘हे’ काम

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
2

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! शेती यंत्रांवरही तगडी Subsidy… ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
3

Tractor Subsidy Scheme : शेतकऱ्यांनो, 10 लाखांचा ट्रॅक्टर 5 लाखांत! शेती यंत्रांवरही तगडी Subsidy… ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन
4

Washim: कापूस खरेदीसाठी उपाययोजना, ४ केंद्रांवर ‘स्थानिक निगराणी समिती’ स्थापन; ‘कपास किसान अॅप’वर नोंदणीचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.