Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv News : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बेकायदेशीर महाकाली कला केंद्र तात्काळ बंद; नियमभंगामुळे कारवाई

Dharashiv News Marathi : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बेकायदेशीरपणे सुरू असलेले महाकाली कला केंद्र तात्काळ बंद करण्यात आले. नियमभंग आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने ही कारवाई केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 14, 2026 | 04:33 PM
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बेकायदेशीर महाकाली कला केंद्र तात्काळ बंद; नियमभंगामुळे कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बेकायदेशीर महाकाली कला केंद्र तात्काळ बंद; नियमभंगामुळे कारवाई

Follow Us
Follow Us:
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बेकायदेशीर महाकाली कला केंद्र तात्काळ बंद
  • नियमभंगामुळे कारवाई
  • नियमांचे उल्लंघन व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : कळंब तालुक्यातील चोराखळी येथे बेकायदा सुरू असलेले महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले आहेत. नियमांचे उल्लंघन व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चोराखळी येथील महाकाली कला केंद्रास परवानगी मिळण्यासाठी संबंधितांकडून यापूर्वी अर्ज करण्यात आला होता. मात्र, विविध विभागांकडून प्राप्त अहवालांच्या आधारे हा अर्ज प्रशासनाकडून नामंजूर करण्यात आला होता. तरीदेखील संबंधितांनी कला केंद्र सुरूच ठेवले होते. दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही संबंधित कला केंद्र बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे निदर्शनास आले.

Dharashiv News: छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहासाठी ५ कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्री शिंदेंचा २४ तासांत निर्णय

धाराशिव येथील पोलीस अधीक्षक तसेच कळंबचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालांमध्ये या कला केंद्रात नियमांचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यात भांडण-तक्रारी वाढून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना तात्काळ कला केंद्र बंद करण्याचे आदेश दिले असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच तहसीलदार, कळंब, पोलीस निरीक्षक येरमाळा व इतर संबंधित अधिकाऱ्यांना संयुक्त कारवाई करून कला केंद्र बंद करण्याचे तसेच पंचनामा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूणच, प्रशासनाच्या आदेशानंतर चोराखळी येथील महाकाली कला केंद्रावर कारवाई होणार असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

राजभाऊ माळी यांनी कळंब तालुक्यात चोराखाली येथे महाकाली कला केंद्र सुरू करण्यासाठी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता, परंतु २८ एप्रिल रोजी अनुदानासाठीचा अर्ज जारी करण्यात आला, मात्र तो फेटाळण्यात आला. पोलीस अधीक्षकांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना एक लेखी अहवाल पाठवला, त्यानुसार माळी यांनी महाकाली कला केंद्र हे अक्षय साळुंखे यांना चालवण्यासाठी भाडेतत्वावर दिले आहे. कला केंद्रात पारंपरिक वाद्यावर कला सादर करणे अपेक्षित असताना साउंड सिस्टीमवर सांस्कृतिक नृत्य करताना मिळून आलेले आहे.

कळंबच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. १२ जानेवारी २०२६ रोजीचा जिल्हाधिकाऱ्यांप्रति असलेला अहवाल, त्यांच्या मते, कला केंद्रामध्ये अनेक उल्लंघने आणि त्रुटी आढळल्या. कला केंद्राच्या इमारतीचे बांधकाम परवानाबाबत कोणतेही कागदपत्र दिसून आलेले नाहीत. प्रत्यक्ष पाहणीत सदर ठिकाणी अंदाजे 50 आर क्षेत्रावर कला केंद्राचे बांधकाम दिसून आले. प्रवेश व बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग नाहीत. नियमानुसार रंगमंच उभारलेला नसून रंगमंचावर कोणतीही व्यवस्था दिसुन आली नाही. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही.

परळमधील स्मारक कागदावरच! बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक करण्याची केली होती घोषणा

Web Title: Mahakali kala kendra illegal closed by district collector action news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Dharashiv
  • maharashtra

संबंधित बातम्या

एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे औपचारिक उद्घाटन; शाळेत अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध
1

एमव्हीपीएमच्या किर्तिश्री काबरा विद्यालयाचे औपचारिक उद्घाटन; शाळेत अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध

St Mahamandal : एसटी महामंडळाचा मोठा बदल! 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत संपूर्ण ताफा ई-बसेसचा
2

St Mahamandal : एसटी महामंडळाचा मोठा बदल! 2035 पर्यंत 80% आणि 2047 पर्यंत संपूर्ण ताफा ई-बसेसचा

जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्…
3

जायकवाडी धरणात दोन मित्रांनी गमावला जीव; सुट्टी असल्यामुळे फिरायला गेले अन्…

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही
4

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.