Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

कोणत्याही परिस्थितीत या वर्षात काम पूर्ण करून पुढील वर्षी चिपळूणचे अद्ययावत बसस्थानक जनतेसाठी खुले केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 01, 2026 | 02:12 PM
चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

Follow Us
Follow Us:

चिपळूण : गेली कित्येक वर्षे रखडलेले चिपळूणच्या एसटी बसस्थानकाचे काम आता कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही. या कामासाठी सध्या अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, गरज भासल्यास आणखीही निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल. कोणत्याही परिस्थितीत या वर्षात काम पूर्ण करून पुढील वर्षी चिपळूणचे अद्ययावत बसस्थानक जनतेसाठी खुले केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. चिपळूण येथील बसस्थानक परिसराच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते.

 

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक शनिवारी कोकण दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चिपळूण येथील एसटी बस स्थानकाला भेट देऊन सुरू असलेल्या संथ गतीतील कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक आमदार शेखर निकम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, आगार व्यवस्थापक दीपक चव्हाण, संदीप सावंत, नगरसेवक कपिल शिर्के, माजी नगरसेवक परिमल भोसले, नगरसेवक फैसल कासकर, राकेश शिंदे, दिलीप चव्हाण यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी तसेच एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व कामाचा घेतला आढावा

सुरू असलेल्या कामाची बारकाईने पाहणी केल्यानंतर सरनाईक यांनी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच हे काम वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात योग्य त्या कायदेशीर व तांत्रिक सूचना दिल्या. या पाहणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना सरनाईक म्हणाले, “चिपळूण स्थानकाचे काम रखडले ही वस्तुस्थिती आहे, यात शंका नाही. परंतु, आता आमदार शेखर निकम यांनी या विषयाचा योग्य आणि आक्रमक पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सध्या अडीच कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. कामाचा दर्जा उत्तम राखत ते वेळेत पूर्ण व्हावे, अशा स्पष्ट सूचना मी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. पुढील वर्षी या स्थानकाचे लोकार्पण करण्यासाठी मी स्वतः चिपळूणमध्ये येईन.”

हे सुद्धा वाचा : अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा; राज्य उत्पादन शुल्क आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश

५ हजार नवीन बसेस येणार

परिवहन विभागाच्या सद्यस्थितीवर बोलताना मंत्री महोदयांनी सांगितले की, सध्यातरी परिवहन विभागाकडे नवीन बसेसची कमतरता नाही. सध्या २ हजार नवीन बसेस सेवेत दाखल झाल्या असून, आणखी ५ हजार नवीन बसेसची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मागणी असेल तिथे नवीन गाड्या दिल्या जातील. मात्र, सध्या कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी शासनाने ‘ठेकेदारी पद्धतीवर’ (कंत्राटी पद्धत) कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असून, आगामी काळात कर्मचाऱ्यांचा बॅकलॉग पूर्ण केला जाईल.

Web Title: Pratap sarnaik assured that the work of chiplun bus stand will be completed next year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Chiplun
  • maharashtra
  • Pratap Saranaik
  • st bus

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.