Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेत मोठे बदल होणार?

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धाराशिव जिल्हा प्रमुख तसेच युवा सेनेच्या प्रमुखांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2026 | 01:35 PM
धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेत मोठे बदल होणार?

धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेत मोठे बदल होणार?

Follow Us
Close
Follow Us:
  • धाराशिवमध्ये राजकीय घडामोडींना वेग
  • शिवसेनेत मोठे बदल होणार?
  • नव्या पदाधिकाऱ्यांची निवड लवकरच होण्याची शक्यता
भूम : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील धाराशिव जिल्हा प्रमुख तसेच युवा सेनेच्या प्रमुखांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केल्याने धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार तानाजी सावंत यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड व काही ठिकाणी खांदेपालट करण्याचे संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. या घडामोडींनंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली असून, पक्षाची पकड टिकवून ठेवण्यासाठी संघटनात्मक बदल आवश्यक ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

 

नाराज पदाधिकारी सक्रिय होणार का ?

गाव, तालुका व जिल्हा स्तरावर नव्या चेहऱ्यांना संधी देत, संघटनाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

नाराज पदाधिकाऱ्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी समन्वय बैठका घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे.

युवकांना अधिक जबाबदाऱ्या देत युवा सेनेच्या माध्यमातून पक्ष विस्तारावर भर दिला जाणार असल्याचे संकेत आहेत.

पोकळी भरुन काढण्याचे प्रमुखांसमोर आव्हान

भाजपमध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली पोकळी भरून मोठे काढणे हे सावंत यांच्यासमोरील आव्हान आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

हे सुद्धा वाचा : महिलांचे शोषण करणारा अशोक खरात महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’, खरातला कोणाचा राजकीय आशिर्वाद? काँग्रेसचा सवाल

धनंजय सावंत यांच्या समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळीच माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा धक्का बसला होता. निवडणुकीआधीच त्यांचे पुतणे धनंजय सावंत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत धनंजय सावंत यांनी भाजपला पाठींबा दिला होता. त्यानंतर महायुती म्हणून भाजप व एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र निव़डणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर आठच दिवसात जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या समर्थकांनी मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये LPG चा तुटवडा? नागरिकांची अडचण; इंडक्शन स्टोव्हला वाढतेय मागणी

Web Title: There is a possibility of major changes in eknath shindes shiv sena in dharashiv district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:34 PM

Topics:  

  • Dharashiv News
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर? नागरिकांचा संताप वाढला
1

Dharashiv News : धाराशिवमध्ये १०८ रुग्णवाहिका सेवा ‘व्हेंटिलेटर’वर? नागरिकांचा संताप वाढला

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
2

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
3

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

Purvesh Sarnaik : “राऊत मंद झाले…, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल
4

Purvesh Sarnaik : “राऊत मंद झाले…, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.