Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिलीप स्वामी यांना सोडावे लागले शासकीय निवासस्थान; ‘या’ कारणामुळे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ

जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांना पोस्टिंग न मिळाल्याने त्यांना सोलापुरातील शासकीय निवासस्थान रिकामे करून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी शासकीय निवासस्थान ताब्यात घेतल्यामुळे स्वामी यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी जावे लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 28, 2023 | 02:22 PM
दिलीप स्वामी यांना सोडावे लागले शासकीय निवासस्थान; ‘या’ कारणामुळे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ
Follow Us
Follow Us:

सोलापूर (शेखर गोतसुर्वे) : जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांना पोस्टिंग न मिळाल्याने त्यांना सोलापुरातील शासकीय निवासस्थान रिकामे करून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी शासकीय निवासस्थान ताब्यात घेतल्यामुळे स्वामी यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी जावे लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांची 20 जुलै रोजी नियुक्ती झाली. याचवेळी तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांची बदली झाली पण त्यांना पोस्टिंग मिळाली नाही. गेल्या तीन महिन्यापासून ते सोलापुरात आपल्या शासकीय निवासस्थानीच तळ ठोकून होते. पोस्टिंग मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईला हेलपाटे मारले. दरम्यान देशातील सहा राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जाण्यासाठी त्यांना दिल्लीतील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. प्रशिक्षण संपवून ते सोलापुरात परतले आहेत.

सोलापूर जिल्हा परिषदेचे घरकुलातील काम मागे पडले होते. पदभार घेतल्यानंतर सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घरकुलाच्या कामाला गती दिली पण त्यांना स्वतःला राहण्यासाठीच शासकीय निवासस्थान मिळत नसल्याचे ‘नवराष्ट्र”ने यापूर्वीच निदर्शनाला आणले होते. ‘नवराष्ट्र” च्या बातमीची दखल घेत कामकाजास अडचण येऊ लागल्याने सीईओ आव्हाळे यांनी स्वामी यांच्याकडे निवासस्थानाचा ताबा मागितला. पण पोस्टिंग मिळेल म्हणून स्वामी वेटिंगमध्ये राहिले. या आठवड्यात दोन वेळा आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या पण त्यात स्वामी यांचा नंबर लागला नाही.

सीईओ आव्हाळे यांनी गुरुवारी यशवंतनगर येथील पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना आपल्या निवासस्थानाचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता खराडे यांनी स्वामी यांना निरोप पोहोचवला. त्यानुसार स्वामी यांनी आपला बाडबिस्तरा अंत्रोळीकरनगरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हलविल्याचे झेडपीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. निवासस्थानाची रंगरंगोटी व दुरुस्ती झाल्यावर सीईओ आव्हाळे या तेथे राहण्यासाठी जाणार आहेत.

थाटमाट संपला…

जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर असताना स्वामी यांच्या दिमतीला मोठी यंत्रणा होती. पण भाड्याच्या घरात राहण्यासाठी जाण्याची वेळ आल्याने सरकारी सुविधा काढून घेण्यात आल्या आहेत. आतापर्यंत यापूर्वीचे सीईओ बदलीनंतर बढतीवर गेले आहेत. यापूर्वीचे सीईओ वायचळ यांना आयएएस पोस्टिंग मिळण्यास अडचण निर्माण झाली तर स्वामी आयएएस असून पोस्टिंग मिळत नसल्याने अशा अडचणी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पोस्टिंग न मिळाल्याने त्यांनी सोलापुरातील मुक्काम वाढविला असून, भाड्याच्या घरात जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Dilip swami had to leave the government residence staying time in rented house due to this reason nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2023 | 02:16 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Dilip Swami
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Zp Solapur

संबंधित बातम्या

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस
1

Neral Bandh: नेरळमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ‘बंद’; आरोग्य विभागाकडून कार्डिओलॉजिस्टच्या उपचारांची शिफारस

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
2

Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती; ३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये ३ महत्त्वाचे उड्डाणपूल होणार खुले; वाहतूककोंडीची समस्या सुटणार

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
4

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.