ई-महाभूमीच्या माध्यमातून शासन झाले 'मालामाल'; अभिलेखातून 76.80 कोटींचा महसूल प्राप्त (File Photo : Mantralay)
मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो-3 मार्गिकेवरील विधानभवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. या भुयारी मार्गाचे 25 टक्के काम पूर्ण झाले असून, जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवातही करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: ; ‘AI’ च्या मदतीने मंत्रालयाची सुरक्षा भक्कम होणार; फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
मुंबईमध्ये दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली आहे. मुंबईतील वाढत्या गर्दीचा ताण सार्वजनिक वाहतुकीवर येत असल्याने बेस्ट, लोकलसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मुंबईवर वाढणारा ताण लक्षात घेता प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात येत आहे. दक्षिण मुंबईत मंत्रालय, विधानभवन या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यावर मात करण्यासाठी मेट्रो ३ मार्गिकेच्या विधानभवन मेट्रो स्थानकातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे.
सब-वेचे फायदे
सरकारी कर्मचाऱ्यांना मेट्रोतून उतरून थेट मंत्रालय, नवीन प्रशासकीय भवन आणि विधानभवनात जाता येईल. थेट कनेक्टिव्हिटीमुळे कर्मचाऱ्यांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज भासणार नाही. त्यातून रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन याची उभारणी करत आहे. या मार्गामुळे मेट्रो ३ मार्गिकेच्या विधानभवन स्थानकाची मंत्रालयाबरोबरच विधानभवनाच्या नवीन प्रशासकीय इमारती थेट जोडल्या जाणार आहे. न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने काम सबवे चे काम सुरू आहे. मेट्रो ३ मार्गिकेचा बीकेसी ते कफ परेड हा दुसरा टप्पा जूनपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे या भुयारी मार्गेचेही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून मेट्रो ३ च्या दुसऱ्या टप्प्याबरोबर सुरू करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.
सुरक्षा परवानगीमुळे काम संथपणे होते सुरू
सबवेचे काम डिसेंबर २०२२ मध्ये सुरू झाले होते. त्यावेळच्या नियोजनानुसार ते डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मंत्रालय आणि विधानभवन यांच्यासारख्या संवेदनशील क्षेत्राजवळ हे काम चालले असल्याने सुरक्षा परवानगीमुळे काम काहीसे संथपणे सुरू सुरू होते. आता या कामांना गती देण्यात आली आहे. न्यू ऑस्ट्रेलियन टनेल पद्धतीने सब-वेचे भुयारीकरण सुरू आहे. तसेच दुसऱ्या पाइलचे काम पूर्ण झाले आहे. आता उर्वरित काम जूनपर्यंत पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे.