Maharashtra breaking News Marathi (Credit- AI)
25 Feb 2026 09:59 AM (IST)
India Share Market Update: गेल्या सत्रातील तीव्र घसरणीनंतर जागतिक बाजारात बुधवारी उत्साही संकेत पाहायला मिळाले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील होण्याची शक्यता आहे. आज बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,६६९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ६९ अंकांनी जास्त होता.
25 Feb 2026 09:50 AM (IST)
Delhi- Maharashtra News: केंद्रीय कॅबिनेटने मंगळवारी विदभांला मोठी भेट दिली आहे. गोंदिया ते जबलपूर दरम्यान २३१ किलोमीटरच्या नव्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. उत्तर ते दक्षिण भारत जोडण्यासाठी ३ मल्टीट्रॅकिंग रेल्वे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहेत. गोंदिया-जबलपूर दुहेरीकरण, पुनारख-किऊल तिसरी आणि चौथी लाईन गम्हारिया-चांडिल तिसरी आणि चौथी लाईन, असे हे हे तीन प्रकल्प महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्यांतील एकूण ८ जिल्ह्यांना जोडणार आहेत, या प्रकल्पांमुळे इंडियन रेल्वे च्या विद्यमान जाळयात सुमारे ३०७ किमीची वाढ होणार आहे.
25 Feb 2026 09:38 AM (IST)
गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) दरम्यान “कांतारा” बद्दल बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने केलेल्या विधानामुळे आणि चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या व्यक्तिरेखेचे त्याने केलेले अनुकरण यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेत्याला फटकारले आणि म्हटले की, तुम्ही रणवीर सिंग असाल किंवा इतर कोणी, सुपरस्टार कायद्याच्या वर नाहीत. उच्च न्यायालयाने सरकारला रणवीर सिंगवर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये असे निर्देश दिले, जर त्याने तपासात सहकार्य केले पूर्णपणे केले.’
25 Feb 2026 09:25 AM (IST)
भारतातील प्रत्येक शिवमंदिरात शिवलिंगासमोर भगवान शंकरांचे परमभक्त नंदी महाराज विराजमान असतात. नंदीशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते. मात्र उत्तर प्रदेशात एक असे विलक्षण मंदिर आहे, जिथे नंदी बसलेल्या स्थितीत नसून उभे आहेत आणि भगवान शिव मेंढकाच्या पाठीवर विराजमान आहेत. हे अद्भुत दृश्य नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे पाहायला मिळते. इच्छापूर्ती महादेव म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर तंत्र परंपरेशी जोडले गेलेले मानले जाते.
25 Feb 2026 09:20 AM (IST)
Ajit Pawar Plane Crash News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. बारामती विमान दुर्घटनेच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक बाबींच्या पार्श्वभूमीवर, DGCA ने ‘VSR वेंचर्स’च्या चार विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घालत त्यांना ‘ग्राऊंड’ करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष सुरक्षा ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
25 Feb 2026 09:15 AM (IST)
नालासोपारा येथील स्थानिक भूमिपुत्र महिला भाजी विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कासाठी २४ फेब्रुवारी २०२६ रोजी विरार येथील महानगरपालिका मुख्यालयासमोर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. पालिकेने भाजी विक्रीच्या पावती दरात मोठी वाढ केल्याने महिलांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून नालासोपारा उड्डाणपुलाखाली व्यवसाय करणाऱ्या या महिलांकडून पूर्वी केवळ २ रुपये पावती आकारली जात होती. मात्र, आता महानगरपालिका थेट १०० रुपये पावती आकारत असल्याने या महिलांवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे.
25 Feb 2026 09:10 AM (IST)
माथेरान मध्ये पर्यावरण पुरक ई रिक्षा यांचा संप सुरू असून आज संपाचा दुसरा दिवस आहे.दुसऱ्या दिवशी देखील एकही ई रिक्षा रस्त्यावर आली नाही आणि त्यामुळे प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल झाले.दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सर्व 94 हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पुरक ई रिक्षा मिळावी यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांचे पदाधिकारी मंत्रालयात पोहचले आहेत.
ऑगस्ट 2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने माथेरान मधील अमानवी प्रथा बंद करण्याचा निर्णय देताना माथेरान मधील सर्व हात रिक्षा चालक यांना पर्यावरण पुरक ई रिक्षा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे असे आदेश दिले आहेत.या आदेशाची महाराष्ट्र शासनाने सहा महिन्यात अंमलबजावणी करावी असे आदेश असल्याने माथेरान श्रमिक रिक्षा संघटना यांनी गेली महिन्यापासून आपली मागणी लावून धरली आहे
25 Feb 2026 09:05 AM (IST)
नागपूर: उपराजधानीच्या महाल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमातील त्रिकोणातून आणि वैयक्तिक रागातून काही तरुणांच्या टोळक्याने मध्यरात्री परिसरात धुमाकूळ घालत दुचाकींची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारामागे सोशल मीडियावरील मैत्रीचे कारण समोर आले आहे. एका तरुणाच्या माजी प्रेयसीची (Ex-girlfriend) इन्स्टाग्रामवर दुसऱ्या मुलाशी मैत्री झाली होती. याच कारणावरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.
25 Feb 2026 09:00 AM (IST)
पल्लेकेले (श्रीलंका): टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीत इंग्लंडने पाकिस्तानचा २ गडी राखून पराभव करत दिमाखात सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. कर्णधार हॅरी ब्रूकच्या वादळी शतकाच्या जोरावर इंग्लंडने १६५ धावांचे लक्ष्य १९.१ षटकात गाठले. या विजयामुळे इंग्लंड उपांत्य फेरी गाठणारा या स्पर्धेतील पहिला संघ ठरला आहे.
पहिले कर्णधार शतक: हॅरी ब्रूक टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात शतक झळकावणारा जगातील पहिला कर्णधार ठरला आहे.
वेगवान शतक: त्याने केवळ ५० चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे इंग्लंडसाठी टी-२० वर्ल्ड कपमधील सर्वात वेगवान शतक आहे.
खेळी: त्याने ५१ चेंडूंत १०० धावा केल्या,
25 Feb 2026 08:50 AM (IST)
जळगाव : जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरुन हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेचा सखोल तपास करताना मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आव्हानही पोलिसांच्या समोर आहे.
25 Feb 2026 08:50 AM (IST)
मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, येत्या १६ मार्च २०२६ रोजी राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश असून, विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ७ जागांपैकी महायुतीचे पारडे जड असून त्यांचे किमान ६ उमेदवार निवडून येऊ शकतात. उर्वरित एका जागेसाठी महाविकास आघाडीने (MVA) हालचाली सुरू केल्या आहेतनिवडणुकीचे महत्त्वाचे टप्पे:
अर्ज भरण्याची अंतिम तारीख: ५ मार्च २०२६
अर्जांची छाननी: ६ मार्च २०२६
अर्ज मागे घेण्याची मुदत: ९ मार्च २०२६
25 Feb 2026 08:45 AM (IST)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी या भेटीबाबत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की पंतप्रधान मोदी या भेटीदरम्यान पंतप्रधान नेतान्याहू यांची भेट घेतील. हे दोन्ही नेते भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारीत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचा आढावा घेतील.
25 Feb 2026 08:42 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 25 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,179 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,831 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,135 रुपये आहे. भारतात 25 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,48,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,61,790 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,21,350 रुपये आहे. भारतात 25 फेब्रुवारी रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 284.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,84,900 रुपये आहे. भारतात 24 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 16,136 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,791 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,102 रुपये होता.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दुपारी कडक उन्ह तर रात्री हवेत गारवा दिसून येत आहे. असे असताना आता हवामान विभागाने ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ विभागात विजांसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार, आता या भागांत ‘यलो अलर्ट’ही जारी केला गेला आहे. परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील झाल्याचे समोर आले आहे.






