निगडी : समाजातील वंचित, दुर्लक्षित आणि आर्थिकदृष्या दुर्बल घटकांतील नागरिकांची दिवाळीसुद्धा उत्साहात साजरी झाली पाहिजे. सामाजिक सलोखा आणि बंधुभाव निर्माण झाला पाहिजे, या भावनेतून चिखली गावातील युवा नेते जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्त्या शितल यादव आणि माजी नगरसेविका स्व. अलकाताई यादव प्रतिष्ठानच्या वतीने या वर्षी गोरगरिब कष्टकरी आणि तृतियपंथीयांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
चिखली आणि परिसरातील तृतीयपंथी बांधव आणि सफाई कामगारांसह विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांना मिठाई वाटप करण्यात आले. तसेच, तृतीपंथी बांधवांना साडी-चोळी देवून आदरभाव व्यक्त करण्यात आला. लक्ष्मीपूजनच्या निमित्ताने आयोजित केलेला हा पिंपरी-चिंचवडमधील एकमेव उपक्रम आहे. या उपक्रमाबत सफाई कामगार आणि तृतीय पंथी नागरिकांनी यादव दाम्पत्याचे आभार मानले. तसेच यादव दाम्पत्यामुळे आमची दिवाळी गोड झाल्याची भावना व्यक्त केली.
[blockquote content=”समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांसह डॉक्टर, सफाई कामगार समाजिक बांधिलकीतून समाजासाठी झटणाऱ्या नागरिकांना मिठाई वाटप करुन यावर्षी दिवाळी साजरी केली. गेल्या दोन वर्षी कोविडच्या महामारीमुळे दिवाळी साजरी करता आली नाही. मात्र, कोविडमुळे माणुसकीची जाणीव प्रत्येकाला झाली. त्या मानवता धर्माचा वसा प्रत्येकाने जोपासला पाहिजे.” pic=”” name=”- जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते, चिखली.”]