संग्रहित फोटो
मुंबई – माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपा (BJP) प्रवेशामुळं शिंदे गटातील (Shinde Group) नेते अस्वस्थ झाले आहेत. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा असल्यामुळं शिंदे गट व भाजपात धूसफूस सुरु आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते अचानक आपल्या गावी निघून गेले, असंही म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांसोबत सरकार स्थापन केले जाईल, असं सुदधा बोललं जातंय. तर दुसरीकेड देवेंद्र फडणवीस यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर नागपुरात झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं असताना, आता याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे एक महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे. त्यामुळं शिंदे गट व भाजपात आलबेल नसल्याचं बोललं जात असताना, भाजपातीलच काही नेत्यांना शिंदे-फडणवीस संसार नको आहे का? काय आहे सध्या राजकीय वर्तुळात चर्चा…
उरावर दगड ठेवून निर्णय घेतला…
दरम्यान, शिंदे-फडणवीसांचा सुखी संसार भाजपातील लोकांनाच नको आहे. हे अनेक घटनाक्रमावरून अधोरेखित होते. त्यातली पहिली घटना म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आले तेव्हा एका कार्यक्रमात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”आमचे आमदार अधिक आहेत, मुख्यमंत्री हा भाजपाचाच हवा होता, पण सरकार स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. हा निर्णय आम्ही उरावर दगड ठेवून घेतला आहे”, असं पाटील म्हणाले. यामुळं शिंदे गटातील नेते नाराज झाले आहेत, त्यानंतर दुसऱ्यांदा अयोध्या, बाबरीबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, बाबरी पाडण्यात किंवा अयोध्यात राम मंदिर उभारण्यास शिवसेनेचं योगदान काहीही नाही. या वादग्रस्त वक्तव्यामुळं चंद्रकांत पाटलांना रोषाला सामोरील जावे लागले. तसेच शिंदे गट व भाजपात यावरुनच धूसफूस सुरु झाली.
खारघर दुर्घटना: भाजप नेते शांत
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यात उष्माघातामुळं चौदा लोकांचे बळी गेले. यावेळी सरकारची बाजू मांडण्यासाठी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त एकही भाजपातील नेता पुढे आला नाही. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. ते सैविधांनिक पदावर असल्यामुळं त्यांना स्पष्टिकरण देणे अनिवार्य आहे. मात्र यावेळी शिंदेंची बाजू सावरण्यासाठी भाजपातील एकही नेता पुढे आला नाही, त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात असून, यामुळं शिंदे-फडणवीसांचा सुखी संसार भाजपातील लोकांनाच नको आहे. हे यावरुन अधोरेखित होते. ही दुसरी घटना आहे.
…तर हा निर्णय केंद्रीय पातळीवर
तिसरी घटना म्हणजे सध्याची परिस्थिती पाहता एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली २०२४ ची निवडणूक लढवणार का? या फडणवीसांच्या विधानाबाबत चंद्रशेखर बावनकुळेंना विचारलं असता, ते म्हणाले की, “कोणत्या आमदाराला किंवा खासदाराला उमेदवारी द्यायची? कुणाला मंत्री बनवायचं? कुणाला मुख्यमंत्री बनवायचं? पार्टीचा अध्यक्ष कुणाला बनवायचं? किंवा नेतृत्व कोणी करायचे याचा निर्णय आज घेतला जाऊ शकत नाही. यावर केंद्रीय संसदीय बोर्डाकडून निर्णय घेतला जातो. त्यामुळं हे सर्व आत्ताच काही सांगता येणार नाही, असं म्हणत हे निर्णय चंद्रशेखर बावनकुळेंच्या अखत्यारित येत नसल्यांच ते म्हणाले. त्यामुळं अप्रत्यक्षरित्या त्यांना फडणवीस हे मुख्यमंत्री नको आहेत. त्यांची देखील मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षा दिसून येते.
मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत भाजपातील कुठले नेते
दरम्यान, या सर्वांचा संदर्भ पहिला तर जेव्हा जेव्हा सरकारवर विरोधकांनी टिका केली. किंवा सरकार अडचणीत सापडले, तेव्हा भाजपातील काही नेत्यांनी कातडी बचाव भूमिका घेतली. आणि स्व:ताची भूमिका घेतली नाही. त्यामुळं शिंदे-फडणवीसांचा सुखी संसार भाजापातील लोकांना नको आहे. दरम्यान, सध्या मुख्यमंत्री होण्याची बँनर लावण्याचे फँड आले आहे. सध्या फडणवीस यांचे नागपुरात भावी मुख्यमंत्री असं बँनर लागले आहेत. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकार येण्याच्या आधी चंद्रकात पाटील देखील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. म्हणून त्यांनी ‘उरावर दगड ठेवून..’ वक्तव्य केले होते. बावनकुळे हे गडकरींच्या जवळचे मानले जातात. जेव्हा बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा आता आगामी काळात बावनकुळे मुख्यमंत्री देखील बनू शकतात, असं गडकरी म्हणाले होते. त्यामुळं बाबनकुळेंना देखील मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जाते. आणि आता फडणवीसांचे बॅनर लागल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.
भाजपातीलच लोकांना सुखी संसार नकोय…
सध्या मुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जातंय, त्यामुळं ते थेट गावी निघून गेले आहेत. कोकणात बारसू आंदोलन पेटले असता, मुख्यमंत्री गायब आहेत. त्यांची बाजू मांडण्यासाठी किंवा सावरण्यासाठी भाजपातील नेते कुठेच दिसत नाहीत. त्यामुळं शिंदे-फडणवीसांचा दहा महिन्यांपासून चाललेला सुखी संसार भाजपातीलच नेत्यांना नकोय, हे वरील संदर्भावरुन स्पष्ट होते. त्यामुळं शिंदे-फडणवीसांचा संसार भाजपातील काही नेत्यांना नकोय, अशी राजकीय वर्तुळाच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.






