(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ३० वर्षीय मल्याळम अभिनेता अखिल विश्वनाथ याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. गळफास घेऊन त्यांने त्याचे जीवन संपवले आहे. अखिलच्या आईने त्याला लटकेलेल्या अवस्थेत पाहिले. या घटनेमुळे सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे.
अखिल कोडली येथील एका मोबाईल फोनच्या दुकानात मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि काही काळापासून कामावर गेला नव्हता. कामावर जाताना त्याच्या आईला मृतदेह सापडला. अखिल विश्वनाथनने बाल कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि सुनील कुमार शशिधरन यांच्या “चोला” या चित्रपटातील भूमिकेने तो दक्षिण भारतात घराघरात प्रसिद्ध झाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याची आई गीता कामावर जाण्यासाठी खोलीत गेली तेव्हा तिला तो दिसला. त्याचे वडील, चुंकल चेन्चेरीवालाप्पिल के. विश्वनाथन यांचा नुकताच अपघात झाला होता आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखिल विश्वनाथन यांना “मंगंडी” या टेलिफिल्ममधील कामासाठी राज्य सरकारचा बाल कलाकार पुरस्कार मिळाला, ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थी असताना त्यांचा भाऊ अरुण यांच्यासोबत काम केले होते. अखिल विश्वनाथन यांचा भाऊ अरुण यांनाही अखिलसोबत राज्य सरकारचा बाल कलाकार पुरस्कार मिळाला.
अभिनेता अखिलच्या निधनाच्या बातमीने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे आणि श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. “चोला” चित्रपटाचे दिग्दर्शक सनल कुमार ससिधरन यांनी शोक व्यक्त करत लिहिले की, “अखिलच्या आत्महत्येची बातमी हृदयद्रावक आहे.” या चित्रपट उद्योगातील कार्यकर्ते मनोज कुमार यांनीही अभिनेत्याचा फोटो शेअर केला आहे, “अखिल, तू काय केलेस?” असे लिहिले आहे.






