इशान किशन(फोटो-सोशल मीडिया)
Jharkhand team’s historic victory : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग टप्प्यामध्ये एक रोमांचक सामना पाहायाला मिळाला. पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या झारखंडने पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून खळबळ उडवली आहे. या सामन्यात धावांचा पाऊस पडला आणि चाहत्यांना चौकार आणि षटकारांचा वर्षाव बघायला मिळाला. यासह, इशान किशनच्या नेतृत्वाखालील झारखंड संघाने सुपर लीगची विजयी सुरुवात करून चार गुण कमावले. या सामन्यात झारखंडकडून दमदार खेळ खेळण्यात आला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब संघाने सलील अरोराच्या शतकाच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २३५ धावा उभ्या केल्या. त्याने ३९ चेंडूत शतक ठोकले. त्याने ४५ चेंडूत नऊ चौकार आणि ११ षटकारांसह नाबाद १२५ धावा फटकावल्या. तथापि, इतर कोणताही खेळाडू ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. दुसरीकडे, या सामन्यात झारखंडकडून सुशांत मिश्रा आणि बाल कृष्ण यांनी प्रत्येकी सर्वाधिक २ विकेट्स मिळवल्या.
झारखंडसमोर पंजाबने दिलेले टार्गेट छोटे ठरल्याचे दिसून आले. झारखंडने केवळ १८.१ षटकांत ४ गडी गमावून सामना आपल्या खिशात टाकला. कुमार कुशाग्राची स्फोटक नाबाद खेळी आणि इशान किशन ने देखील दमदार खेळी करून महत्वाची भूमिका बजावली आहे. इशान किशनने केवळ २३ चेंडूत ४७ धावा करत धावांचा पाठलाग केला. त्यानंतर कुमार कुशाग्राने ४२ चेंडूत नाबाद ८६ धावा करत सामना फिरवला. त्याने त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकार लगावले. अनुकुल रॉयने ३७ धावा आणि पंकज कुमारने ३९ धावा करून संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले.
हेही वाचा : फुटबॉलचा जादूगार Lionel Messi ने भारतीय भूमीवर ठेवले पाऊल, एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, Video Viral
या सामन्यात दोन्ही संघांनी एकत्रितपणे ४३२ धावा फटकावल्या. जो टी-२० क्रिकेटमधील एक दुर्मिळ कामगिरी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला आहे. झारखंडने मुंबईचा विक्रम मोडीत काढला आहे. जो २०२४ मध्ये मुंबईने आंध्र प्रदेशविरुद्ध २३० धावांचे लक्ष्य यशस्वी गाठला होता.






