जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
A six off Jasprit Bumrah’s bowling : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना वाईट ठरला. या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेने ५१ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारतीय गोलंदाजीसह फलंदाजीमध्ये देकशील अपयशी ठरला. यामध्ये सर्वात आश्चर्यकारक कामगिरी स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची राहिली आहे. ज्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ४५ धावा मोजल्या. बुमराहला विकेट देखील मिळाली नाही. परंतु, त्याला जास्त षटकार ठोकण्यात आले. तथापि, या वर्षभरात टी-२० मध्ये त्याची कामगिरी बिकट राहिली आहे. २०२५ मध्ये जवळजवळ पाच वर्षांच्या षटकारांच्या तुलनेत या वर्षी त्याला जास्त षटकार ठोकले गेले आहेत.
चंदीगडमधील नवीन स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २१३ धावा उभ्या केल्या होत्या. क्विंटन डी कॉकच्या ४६ चेंडूत ९० धावांच्या धमाकेदार खेळीमुळे आफ्रिकन संघाने 200 कहा आकडा पार केला. त्याच्या खेळीत सात षटकारांचा समावेश होता. त्याने यापैकी एक षटकार जसप्रीत बुमराहला लागवला होता. पण फक्त डी कॉकनेच नाही, तर त्याच्या दोन सहकाऱ्यांनी देखील भारतीय वेगवान गोलंदाजाला षटकार ठोकले आहेत. डी कॉकच्या आधी, रीझा हेंड्रिक्सने त्याच षटकात सहा धावा देण्यासाठी चेंडू मारला आणि त्यानंतर, २० व्या षटकात, डोनोवन फरेरा यांनी प्रत्येकी दोन षटकार लगावले.
जसप्रीत बुमराहला या सामन्यात चार षटकार खावे लागले.जे त्याच्या संपूर्ण टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिल्यांदाच असे घडले आहे. यामुळे या वर्षी जसप्रीत बुमराहची आकडेवारी अधिकच खराब झाली. भारतीय वेगवान गोलंदाजाने २०२५ मध्ये १० सामन्यांमध्ये १० डावात गोलंदाजी केली असून या दरम्यान त्याला ३७.४ षटकांत १० षटकार मारण्यात आले आहेत. इतर अनेक गोलंदाजांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी असले तरी, बुमराहची ऊंची आणि त्याच्या विक्रमाचा विचार करता ही आकडेवारी खूपच वाईट आशीच आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, याआधी, २०२० ते २०२४ या सलग पाच वर्षांत, बुमराहने २७ डावांमध्ये फक्त १२ षटकार मारले होते, जवळजवळ त्याने १०० षटके गोलंदाजी केले होती.
हेही वाचा : Under-19 Asia Cup: वैभवच्या विक्रमी शतकामुळे भारताने UAE ला लोळवले! 234 धावांनी मिळवला विजय
हा विक्रम मोडला जाईल?
इतकेच नाही तर, बुमराहची आकडेवारी आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत अजून देखील तीन सामने शिल्लक आहेत आणि बुमराहचा सध्याचा फॉर्म पाहता, तो १२ षटकारांची बरोबरी करेल असे दिसून येत आहे. शिवाय, बुमराह त्याचा नऊ वर्षांचा जुना विक्रम देखील मोडीत कडू शकेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर, २०१६ मध्ये जेव्हा बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याने २१ टी-२० डावांमध्ये एकूण १५ षटकार मारण्यात आले होते. त्यानंतर, त्याने एकाच वर्षात कधीही चारपेक्षा जास्त षटकार मारू दिले नाहीत. परंतु, यावेळी जुन्या विक्रमाची बरोबरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






