Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; “संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ”, प्रा. कांगणेंचे प्रतिपादन

Satara News : म्हसवड शहरात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी भूमिका मांडली.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 01:47 PM
Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary celebrated in great enthusiasm in Mhaswad Satara News

Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary celebrated in great enthusiasm in Mhaswad Satara News

Follow Us
Follow Us:

Satara News : म्हसवड : ज्याला स्वत:च्या देशात पुस्तक वाचायला बंदी होती, त्याने परदेशात जाऊन शिक्षण पुर्ण करुन पुन्हा आपल्या देशात येवुन एक असे पुस्तक लिहले, आज संपूर्ण भारत देश त्यांच्या पुस्तकावर चालतोय त्या पुस्तकाचे नाव आहे संविधान. आणि त्याचे लेखक आहेत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.(Baba Ambedkar) ज्यांनी ज्यांनी हे संविधान वाचले त्या प्रत्येकाला जीवन जगता आले, जो त्यांच्या विचारावर चालतोय त्याला यशाचा मार्ग भेटतोय.. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो हे दुध पिलाय तो गुरगुरणारच. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेले संविधान हाच सर्वात मोठा ग्रंथ असून सर्वांनीच या ग्रंथाचा अभ्यास करावा असे आवाहन जेष्ठ व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी केले.

म्हसवड शहरात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ व्याख्याते प्रा. विठ्ठल कांगणे यांनी भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त म्हसवड येथील जयभिम युवक मंडळाच्या वतीने शहरात ११ एप्रिल ते १४ एप्रिल असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तक प्रदर्शन, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी यासारखे उपक्रम जयंतीनिमित्त राबवण्यात आल्याने शहरातून समाधान व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा : नाशिकच्या TCS नंतर आता पुण्यातील Infosys मध्ये लव्ह जिहादचा डाव? IT क्षेत्रात उडाली खळबळ

यावेळी म्हसवड पंचक्रोशीतील विविध स्पर्धा परिक्षेत ज्यांनी यशाचा झेंडा रोवला आहे, अशा सर्वांचा प्रा. कांगणे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. कांगणे यांनी जे यश मिळवले आहे ते यश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच मिळवू शकले असल्याचे सांगत महिलांचे शोषण थांबवण्यासाठी त्यांनी घटनेत विविध कलमे लिहुन महिलांना सर्वत्र समान अधिकार दिले असल्याचे सांगितले.

शिक्षण हा भारतातील सर्वांचा तो अधिकार आहे तो सर्वांना मिळावा यासाठी डॉ. आंबेडकरांनी सर्वांना समान अधिकार देणारी घटना लिहली आहे. या देशाच एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा शिक्षणाच्या जोरावर विविध शासकीय कार्यालयात अधिकारी बनू शकतो हे फक्त माझ्या बाबासाहेबांमुळेच घडतंय, मागासवर्गीय जनतेचा विकास व्हावा त्यांचा सामाजिक स्तर उंचवावा यासाठीही बाबासाहेबांनी निवडणूक प्रक्रियेत या समाजासाठी आरक्षण ठेवले. त्यामुळेच आज आमच्या दलितातून आमदार, खासदास, कोणी मंत्री होत आहे, ही किमया फक्त आंबेडकरांनी लिहलेल्या घटनेममळेच होऊ शकली. आज महिला वर्ग पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहे तो त्यांना घटनेने दिलेल्या अधिकारामुळेच, असे मत प्रा. कांगणे यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा : पुण्यात शहर परिवर्तन समिती स्थापन; शासकीय यंत्रणांमध्ये अधिक समन्वय साधला जाणार

“महाराष्ट्र ही भुमी संताची, हुतात्म्यांची आणी शौर्याची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची आहे या सर्वांनी कधीच बुवाबाजी केली नाही किंवा तशी शिकवण समाजाला दिली नाही, मात्र आज काल बुवाबाजी आणि भोंदुगिरीने राज्यात थैमान घातले आहे, रोज एक नवीन बाबा व त्यांचे कांड समोर येत आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशा घटना शोभत नाही. आजची नारी ही सुशिक्षित असली तरी अशा भोंदुगिरीला त्याच बळी पडत आहे. आजच्या डिजीटल जमान्यात चमत्काराला थारा नाही त्यामुळे अशा प्रवत्ती वेळीच ठेचून काढा,” असेही आवाहन शेवटी प्रा. कांगणे यांनी केले.

 

Web Title: Dr babasaheb ambedkar birth anniversary celebrated in great enthusiasm in mhaswad satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • babasaheb ambedkar
  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
1

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
2

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
3

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
4

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.