मुंबई : राज्यात सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. प्रचंड उन्हाचा कडाका जाणवत असतानाच अवकाळी पावसाचा फटकाही बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले. ‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असून, पाऊस पडून धरणे भरण्यास ऑगस्ट उजाडेल’, असे ते म्हणाले.
राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक आहे. उजनी धरणात उपयुक्त जलसाठा शून्य टक्क्यावर आला आहे. सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. दुष्काळ इतका आहे की, पाऊस पडून धरणे भरण्यास ऑगस्ट महिना उजाडेल. यातच सध्या राज्यातील 10 हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणे भरण्यासही वेळ लागणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या धरण साठ्यात फक्त 10 टक्के इतकाच साठा आहे. त्यामुळे तिथेही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. राज्यातील एकूणच दुष्काळी परिस्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.