दिवा : भंडार्ली (Bhandarli) येथे डंपिंगसाठी (Dumping Ground) तीन लाख ६५ हजार चौरस फूट जागा घेतल्यानंतरही, दिव्यात (Diva) डंपिंग ग्राऊंड बंद करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याबद्दल, तसेच डंपिंग ग्राऊंडवर सतत लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे वाढणाऱ्या आजापणामुळे त्याभागातील जनता त्रस्त असल्याने भाजपच्या (BJP) वतीने दिवा डंपिंग ग्राऊंडवर (Agitation) आंदोलन करण्यात आले.
डंपिंग ग्राऊंडकडे येणाऱ्या गाड्या अडवून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन झाले. त्यानंतर दहा दिवसांत दिव्यातील डंपिंग ग्राऊंड बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला.
दिवा येथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपली आहे. मात्र, तेथे आणखी दररोज शेकडो गाड्यांमधून ३ ते ४ टन कचरा टाकला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली दिवावासियांनी डंपिंग विरोधात आधी आंदोलन केले होते.
या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही ते बंद न केल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांच्या सुचनेनुसार आज तीव्र आंदोलन करण्यात आले. भाजपाचे कार्यकर्ते व शेकडो नागरिकांनी दिवा येथील डंपिंग ग्राऊंडकडे जाणाऱ्या गाड्या रोखल्या. त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तसेच महापालिकेच्या दिवा प्रभाग समितीचे प्रभारी सहायक आयुक्त फारूक शेख यांनी लवकरच येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचे आश्वासन दिले.
[read_also content=”मुंबई पालिकेच्या प्रभाग पुनर्रचनेवर कार्यवाही नाहीच, उच्च न्यायालयात राज्य सरकारची ग्वाही; याचिकेवरील सुनावणी ५ जानेवारीपर्यंत तहकूब https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-governments-testimony-in-high-court-no-proceedings-on-ward-reorganization-of-bmc-hearing-on-the-petition-adjourned-till-january-5-nrvb-355245.html”]
यावेळी भाजपने एक गंभीर इशाराही पालिका प्रशासनाला दिलेला आहे की येत्या दहा दिवसात जर तुम्ही डम्पिंग बंद केले नाहीत तर पुन्हा दिव्यातील जनता उग्र आंदोलन करून रस्त्यावरती उतरेल, याची दखल महापालिकेने घ्यावी.
या आंदोलनात भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे, मिलिंद पाटणकर, नारायण पवार यांच्याबरोबरच भाजपाचे दिवा येथील मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, मुंब्रा मंडल अध्यक्ष कुणाल पाटील, शीळ मंडल अध्यक्ष बाळाराम पाटील, शीळ मंडल उपाध्यक्ष विनोद वास्कर, कार्यकारिणी सदस्य गणेश भगत, विजय भोईर, दिवा संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, भाजपा महिला दिवा अध्यक्ष ज्योती पाटील, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, दिवा उपाध्यक्ष महेंद्र भगत, सीमा भगत, पंकज सिंग, वीरेंद्र गुप्ता, अवधराज राजभर, युवती प्रमुख विशाखा दांडेकर, अमीता तांबे, जिनल सोळंकी, मुकेश जयस्वाल, जीलाजित तिवारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.