जेतेपदाच्या सामन्यात भारताचा इंग्लंडसमोर ४१२ धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG U19 World Cup Final LIVE : अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर भारत १९ वर्षांखालील आणि इंग्लंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात विश्वविजेतेपदासाठी लढत सुरू आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या १७५ धावांच्या जोरावर षटकात ९ गडी गमावून ४११ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंड संघाला विजयासाठी ४१२ धावा कराव्या लागणार आहे. इंग्लंडकडून जेम्स मिंटो सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर आरोन जॉर्ज ९ धावा करून बाद झाला. त्यानंतर मात्र सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रेने डाव सांभाळत चांगली भागीदारी रचली. वैभव आणि म्हात्रे या दोघांनी १४२ धावांची भागीदारी रचली. कर्णधार आयुष म्हात्रेने ५१ चेंडूत ७ चौकर आणि २ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. त्याला अॅलेक्स ग्रीनने बाद केले.
त्यानंतर वैभव सूर्यवंशीने ५५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ७ षटकार लगावले. शतकानंतर वैभव सूर्यवंशी अधिक घातक बनला. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. तो दुहेरी शतक लगावेल असे वाटत असतानाच तो १७५ धावांवर बाद झाला. त्याने ८० चेंडूत १५ चौकार आणि १५ षटकरांच्या मदतीने १७५ धावांची खेळी केली. तो पर्यंत वैभव आणि वेदांत त्रिवेदी या दोघांनी ८९ धावांची भागीदारी रचली. वैभवला त्याला मॅनी लुम्सडेनने बाद केले. तोपर्यंत त्याने भारताला मजबूत स्थितीत पोहचवले होते.
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यावर भारताची धावगती संथ झालेली दिसून आली. वेदांत त्रिवेदी आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला. वेदांत ३२ धावा करून बाद झाला. तर विहान मल्होत्रा ३० धावा करून माघारी गेला. त्यानंतर अभिज्ञान कुंडूने ४० धावांचे योगदान दिले आणि तो बाद झाला. तसेच अबरीश १८ धावा करून बाद झाला. खिलन पटेल ३ धावा तर हेनिल पटेल ५ धावा करून माघारी परतले. तर दुसऱ्या बाजूने कनिष्क चौहान २० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३७ धावा करून नाबाद राहिला आणि संघाची धाव संख्या ४०० पार पोहचवली. दीपेश देवेंद्रन ० धावा काढून नाबाद राहिला. इंग्लंडकडून जेम्स मिंटो सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या, अॅलेक्स ग्रीन आणि सेबॅस्टियन मॉर्गन यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मॅनी लुम्सडेनने १ विकेट घेतली.
इंग्लंड १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: बेन डॉकिन्स, जोसेफ मूर्स, बेन मेयेस, थॉमस रीव्हज (कर्णधार), कॅलेब फॉकनर, राल्फी अल्बर्ट, फरहान अहमद, सेबॅस्टियन मॉर्गन, जेम्स मिंटो, मॅनी लुम्सडेन, अॅलेक्स ग्रीन
भारत १९ वर्षांखालील प्लेइंग इलेव्हन: आरोन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू आरएस अम्ब्रिस, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन
बातमी अपडेट होत आहे..






