कल्याण : बैैलगाडा शर्यतीदरम्यान वाद हा काही नवा प्रकार नाही. परंतु आता दगडफेक आणि गोळीबार सारख्या प्रकार होऊ लागल्याने या शर्यती आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये हा वाद झाल्याचे समोर आले आहे. शर्यती दरम्यान कोणतीही ही अप्रिय घटना कधीही घडू शकते. बैलगाडा शर्यती आयोजित करणारी समिती आणि पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे.
पनवेल येथील ओवाळा गावात आयोजित बैलगाडा शर्यती दरम्यान मोठा वाद झाला. या शर्यती दरम्यान राहूल पाटील आणि संदीप माळी यांच्या गटाकडून एकमेकांवर शेरेबाजी करण्यात आली. या दरम्यान एकच गोंधळाची परिस्थिती उद्भवली हाेती. या घनटेचे काही व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झालेले आहेत. ज्यामध्ये एका गटाकडून दुसऱ्याला शिवीगाळ केलीजात आहे. दगडफेक केली जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओत एक तरुण गोळी झाडत असल्याचा दिसून येत आहे. गोळी झाडल्याचा आवाज देखील स्पष्ट ऐकू येत आहे. गोळीबार करणारा तरुण राहुल पाटील गटाच्या असल्याची चर्चा आहे.
राहूल पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत. तर संदीप माळी हे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून असे गैरप्रकार होत असल्याने याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राहूल पाटील यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहे. आमदार गणपत गायकवाड प्रकरणात पोलीस ठाण्यात राहूल पाटील यांच्यावर गायकवाड यांनी गोळी झाडली होती. यापूर्वी बैलगाडा शर्यती दरम्यान पंढरी फडके आणि राहूल पाटील यांच्या वादानंतर गोळीबाराची घटना घडली होती. ज्या प्रकारे ही गोळीबाराच्या घटना सुरु आहेत. त्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जाणार का बैलगाडी शर्यती दरम्यान सहभागी होणारे राजकीय पदाधिकारी यांची गुन्हे गारी पार्श्वभूमी तपासणार की नाही. या प्रकरमात नवी मंंबई पोलीस काय कारवाई करत आहेत याकडे लक्ष लागले आहे.