Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून गेले अनेक दिवस लढा देत असलेले मनोज जरांगेंवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. नुकतेच अजय बारस्कर या महाराजांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आज मराठा आंदोलक असलेल्या संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगेंवर आरोप केले याला प्रत्त्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी वानखेडे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात
प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव आहे, असा जोरदार पलटवार करीत संगीता वानखेडे यांच्या आरोपावर जरांगे पाटील यांनी आक्षेप नोंदवला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता. याला उत्तर देत त्यांना किंमत द्यायची नाही समाज महत्वाचा आहे. प्रत्येकाचं उत्तर देत बसलं तर माझं आंदोलन कुठं जाईल. त्यामुळे ते सोडूनच द्या आता यांच्यावर आता उत्तर देणारच नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे.