फोटो सौजन्य - सोशल मीडिय
मुंबई – राज्य सरकारकडून यावर्षीच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. महिला, विद्यार्थी व जेष्ठांसाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनांमध्ये माझी लाडकी बहीण ही योजना लोकप्रिय ठरली आहे. या योजनेचा राज्य सरकारकडून जीआर देखील काढण्यात आला आहे. सर्वसामान्य महिलांना या योजनेसाठी अर्ज करण्यास देखील सुरुवात केली आहे. या माझी लाडकी बहीण योजनेबाबत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
राज्य सरकारकडून काही अटी शर्तींसह लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. यामधून दर महिना महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये दाखल होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून या योजनेचे कौतुक होत आहे. तर महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपयांनी काय होणार आहे असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत. दरम्यान, राज्यातील महिलांनी मात्र या योजनेला मोठा प्रतिसाद दिला आहे. अनेक केंद्रांवर महिलांची चांगली गर्दी झालेली दिसत आहे. मात्र या योजनेवर मुस्लीम समाजाबाबत मनेसे नेते प्रकाश महाजन यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माझी लाडकी बहीण या योजनेबाबत मत व्यक्त केले. प्रकाश महाजन म्हणाले, राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे राज्यामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.