जगभरातील असंख्य लोकांचे ग्रीन टी हे आवडते पेय आहे. ग्रीन टी प्यायल्यामुळे अनेकांना कायमच फ्रेश आणि रिफ्रेशिंग वाटते. पण सतत कडू चवीचा चहा पिऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पेय पिण्याची खूप जास्त इच्छा होते. ग्रीन टी च्या सेवनामुळे डिटॉक्सिफाय सुधारते, चयापचय सक्रिय राहते आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला ग्रीन टी पिऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही इतर कोणत्या रिफ्रेशिंग पेयांचा रोजच्या आहारात समावेश करू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतील. (फोटो सौजन्य – istock)
Green tea पिऊन कंटाळा आला असेल तर 'या' रिफ्रेशिंग पेयांनी करा दिवसाची आनंदी सुरुवात

हिरव्या चहामध्ये ताजी तुळशीची पाने उकळवून प्यायल्यास ग्रीन टी ची चव चांगली लागेल. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

ग्रीन टी बनवल्यानंतर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकून प्यायल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील आणि शरीर डिटॉक्स होईल. लिंबाच्या रसातील विटामिन सी मुळे त्वचा चमकदार राहील.

ग्रीन टी ची चव जर तुम्ही कडू वाटत असेल तर त्यात तुम्ही मध मिक्स करून पिऊ शकता. यामुळे पोट आणि मांड्यांवर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत होईल.

ताज्या पुदिन्याच्या पानांचा वापर करून बनवलेला ग्रीन टी चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातील.

दालचिनी, वेलची किंवा लवंग घालून बनवलेला ग्रीन टी चवीला मसालेदार लागतो. पण यामुळे ग्रीन टी चा कडवटपणा कमी होऊन चव सुधारते. नियमित प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून दूर राहाल.






