धानोरा गुरव : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील (Nandgaon Khandeshwar Taluka) शिलोडा येथील जळू नाला( Jalu Nala) शेतकऱ्यांना आत्मदहनाचे (self-immolation) कारण बनला आहे. पाच वर्षांअगोदर शिलोडा गावातून वाहत असलेल्या जळू नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. त्यावेळेस ग्रामस्थांनी सदर नाल्याच्या खोलीकरणासाठी विरोध केला होता. पूराचे पाणी शेतात शिरत आहे. त्यामुळे येथील हजारो हेक्टर पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जळू नाल्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
शिलोड गावातील ६० टक्के शेती जळू नाल्याच्या पलीकडच्या दिशेला आहे. तेव्हा प्रशासनाचे काही मोठ्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन जळू नाल्याच्या खोलीकरण झाल्याबरोबर लगेच जळू नाल्यावर आपणास पूल बांधून देण्यात येईल, असी समजूत काढून दिली होती. परंतु, आज पाच वर्षे उलटून सुद्धा जळू नाल्यावर पूल बांधला गेला नाही. पाच वर्षात शेतकऱ्यांनी बरेचदा माजी आमदार वीरेंद्र जगताप (Former MLA Virendra Jagtap), आमदार प्रताप अडसड (MLA Pratap Adsad), खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas), तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर, जिल्हा परिषद कार्यालय अमरावती (Zilla Parishad Office Amravati) यांना भेट देऊन ह्या पुलासाठी लेखी तक्रार सुध्दा दिल्या. परंतु, अद्यापही कोणी पूल बांधायचा प्रयत्न केला नाही. पूल नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेती करणे १०० टक्के बंद पडले आहे, तरीही काही शेतकरी आपला जीव धोक्यात टाकून नाल्यातून पायदळ प्रवास करून शेतात जाण्याचा प्रयत्न करत आहे.
स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून शेती करत आहे. सदर नाल्याला पावसाळ्यात ६ ते ७ फूट खोल व ५० ते ६० फूट लांब पाण्याचे पात्र असते. या वर्षी सतत चालू असलेल्या पावसामुळे हे नाल्याचे पात्र आणखी वाढले आहे. वर्षी जर आता पुलाच्या कामाला सुरुवात नाही झाली तर जानेवारी २०२३ महिन्यात शिलोड गावातील सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिस अमरावती येथे आमरण उपोषणाला बसणार आहे, अशी शेतकरी व गावातील लोकांनी त्यांचा मनातील व्यथा व्यक्त केली. या वेळेस गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रज्वल अरुण चौधरकर, पोलीस पाटील नरेश पांडे, विनोद पांडे, अतुल सवटे, हितेश ढोखणे, बादल ढोबळे, धनराज सवटे, व गावातील समस्त शेतकरी उपस्थित होते.