Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 14, 2026 | 02:45 PM
शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड

शेतकऱ्यांनो, एचटीबीटी बियाण्यांपासून दूर राहा! उल्लंघन केल्यास ५ वर्षे कारावास, १ लाखाचाही होऊ शकतो दंड

Follow Us
Follow Us:

तालुक्यात खरीप हंगाम २०२६-२७ ची तयारी सुरू झाली असून या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कापूस लागवडीसाठी शासनाची मान्यता नसलेल्या बीजी-३ (एचटीबीटी) बियाण्यांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ५ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. शासनाने सध्या कापूस लागवडीसाठी बीजी-१ आणि बीजी-२ या वाणांच्या बियाण्यांनाच मान्यता दिली आहे. मात्र बाजारात ‘राउंडअप बीटी’, ‘चोर बीटी’, ‘बीडगार्ड’ किंवा एचटीबीटी अशा नावांनी बियाण्यांची विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे. ही बियाणे बेकायदेशीर असून पर्यावरणासाठी घातक असल्याने त्यांचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(फोटो सौजन्य – istock)

‘लिव्हिंग विल’साठी डिजिटल प्लॅटफॉर्म! शेती वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत. खरेदी करताना पक्के बिल घेणे आवश्यक असून त्यात पीक, वाण, लॉट क्रमांक आणि कंपनीचे नाव नमूद असल्याची खात्री करावी. तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी. बीजी-२ (बोलगार्ड-२) वाणाची अधिकृत किंमत ९०१ रुपये असल्याचेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

बियाण्याचे पाकीट पूर्णपणे सीलबंद आहे का, तसेच त्यावरील उगवणीची अंतिम मुदत तपासून पाहणेही आवश्यक आहे. सर्व वाणांमध्ये बीजी-२ तंत्रज्ञान समान असल्याने विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करू नये, तसेच पूर्व हंगामी लागवड टाळावी, असेही कृषी विभागाने सांगितले आहे. काही ठिकाणी बेकायदेशीर बियाणे विनापावती आणि जास्त दराने विकली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा बियाण्यांच्या पाकिटांवर गुणवत्तेची माहिती, तंत्रज्ञान किंवा कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याबाबत कोणताही तपशील नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे हळद पिकाच्या उत्पादनात मोठी घट! उमरखेड-महागाव तालुक्यातील स्थिती; विविध रोगाचा प्रादुर्भाव

शासनाने केवळ बीजी-१ आणि बीजी-२ या वाणांच्या कापूस बियाण्यांना मान्यता दिली आहे. ‘राउंडअप बीटी’, ‘चोर बीटी’, ‘वीडगार्ड’ किवा एचटीबीटी यासारखी बियाणे बेकायदेशीर असून ती पर्यावरणास घातक आहेत. या बियाण्यांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची लागवड करणे टाळावे, अशी माहिती फाल्गुनी ननीर, कृषी गुणनियंत्रण अधिकारी, दर्यापूर, यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Farmers stay away from htbt seeds violation can lead to imprisonment for 5 years fine up to 1 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • amaravati news
  • amravati
  • farmer

संबंधित बातम्या

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा
1

Amravati News: पाण्याची टाकी असूनही कृत्रिम पाणीटंचाई! नदीवर अवलंबून राहण्याची वेळ; निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..
2

Farmmers Impact On Kharif Crops : शेतकऱ्यांच्या उत्पादनावर घट, खरीप पिकांवर मोठा परिणाम…..

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश
3

Amravati News: दुष्काळी परिस्थितीत प्रशासन सज्ज! जिल्हाधिकाऱ्यांचे दुष्काळ कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश

Yavatmal News: ५५९ गावांना कृषी संजीवनीचा आधार! जलसंधारणापासून कृषिपूरक व्यवसायापर्यंत शेतकरींना अर्थसहाय्य
4

Yavatmal News: ५५९ गावांना कृषी संजीवनीचा आधार! जलसंधारणापासून कृषिपूरक व्यवसायापर्यंत शेतकरींना अर्थसहाय्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.