Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News : सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार! पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध; बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार

सफाळे येथील पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित 'एस्सार पेट्रोलियम' प्रकल्प आणि संभाव्य 'विमानतळ' प्रकल्पाविरोधात स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि भूमिपुत्रांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. एडवण येथील शिवमंदिरात झालेल्या संयुक्त बैठकीत १,२१६ हेक्टर जमीन संपादनामुळे उपजीविकेवर होणाऱ्या गंभीर परिणामांवर चिंता व्यक्त केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 12:04 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सफाळे किनारपट्टीवर प्रकल्पांविरोधात एल्गार!
  • एस्सार पेट्रोलियम अन् विमानतळाला विरोध
  • एडवणच्या बैठकीत जनआंदोलनाचा निर्धार
Palghar News : पालघर येथील  सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरात प्रस्तावित एस्सार पेट्रोलियम प्रकल्प आणि संभाव्य विमानतळ प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. एडवण येथे झालेल्या संयुक्त बैठकीत विविध गावांतील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांनी एकत्र येत या दोन्ही प्रकल्पांमुळे शेती, मत्स्यव्यवसाय, पर्यावरण आणि स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली. गावागावांत जनजागृती मोहिम राबवून व्यापक लोकआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.

पालघरमध्ये पुराचे थैमान; वीजपुरवठा ठप्प, 2 लाख लोक अंधारात, तब्बल 900 नागरिकांचे स्थलांतर

पेट्रोलियम प्रकल्पाचा प्रस्ताव

सफाळे पश्चिम किनारपट्टी परिसरातील सुमारे १ हजार २१६ हेक्टर जमीन संपादित करून एस्सार पेट्रोलियम प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी दांडी, उसरणी, मधुकरनगर, भादवे, मथाणे व इतर गावांतील जमिनींचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी, मच्छीमार आणि भूमिपुत्रांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. जमिनींचे संपादन झाल्यास पारंपरिक व्यवसाय उद्ध्वस्त होतील, किनारपट्टीच्या पर्यावरणीय समतोलाला धोका निर्माण होईल आणि स्थानिकांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

विमानतळ प्रकल्पालाही एकमुखी विरोध

एडवण येथील शिवमंदिरात झालेल्या संयुक्त बैठकीला एडवण, कोरे, दातिवरे, मथाणे, भादवे, खटाळी आदी गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत प्रस्तावित एस्सार पेट्रोलियम प्रकल्पाबरोबरच संभाव्य विमानतळ प्रकल्पालाही एकमुखी विरोध नोंदवण्यात आला. कोणताही विकास प्रकल्प स्थानिकांची संमती, पारदर्शक प्रक्रिया आणि पर्यावरणीय निकषांचे पालन केल्याशिवाय राबवू नये, अशी ठाम भूमिका उपस्थितांनी मांडली.

विकासाच्या नावाखाली उपजीविकेवर परिणाम

एस्सार कॅपिटल अॅडव्हायझरी इंडिया लिमिटेडने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून जमीन संपादन प्रक्रिया सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून, १८ जून रोजी भूसंपादन विभागाकडे प्रस्तावित नकाशे व आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या उपजीविकेवर व पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाला शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने ठाम विरोध केला जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे सफाळे किनारपट्टीवरील प्रस्तावित प्रकल्पांचा मुद्दा आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

वैधानिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार

  • गेल्या वर्षभरापासून संबंधित कंपनीकडून परिसराची पाहणी सुरू असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
    मात्र, या प्रकल्पाला अद्याप राज्य सरकारची अंतिम मंजुरी मिळालेली नसून, त्यानंतर भूसंपादन, पर्यावरणीय परवानग्या आणि
  • जनसुनावणीसह सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
  • यावेळी वाढवण बंदरविरोधी युवा संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी भूसंपादन कायदे, पर्यावरणीय परिणाम आणि नागरिकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन केले.
  • प्रत्येक गावात जनजागृती बैठका घेऊन नागरिकांना प्रकल्पाची माहिती देणे आणि सर्व प्रभावित गावांना एकत्र आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
मान्सून ट्रेक ठरला थरारक! धुक्यामुळे तंदुळवाडी किल्ल्यावर सहा पर्यटक भरकटले; 112 वर कॉल करताच सुरू झाले रेस्क्यू ऑपरेशन

Web Title: Palghar safale edwan meeting protest against proposed essar petroleum and airport project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • airport
  • farmer
  • fishermen
  • Marathi News
  • palghar
  • Palghar news
  • petrol pump
  • Protest

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.