फोटो - istock
धुळे : धुळे तालुक्यातील बाळापुर व फागणे गावालगत असलेल्या कोती नाला पूल व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर आज भीषण अपघात आहे. मोटारसायकल व अज्ञात वाहतुक वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि त्याच्या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातामुळे याठिकाणी वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती.
शिवाजी नारायण राजपूत अंदाजे (वय वर्षे 50) राहणार सावदा जळगाव जिल्हा असा अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. शिवाजी राजपूत हे सावदा गावातील पोलीस पाटील असल्याची माहिती उपस्थित काही नागरिकांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील कोती नाला पुलावर हा भीषण अपघात झाला. यावेळेस जोरदार पाऊस पडत होता, त्यामुळे वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघात झाल्याची घटना लवकर कोणाच्या लक्षात आली नाही. त्यामुळे शिवाजी राजपूत यांना मदत देखील करता आली नाही.
अपघात होऊन या ठिकाणी संबंधित प्रशासनाला संपर्क साधण्यात आला मात्र तासभरापासून कोणीही न आल्यानं शेवटी गावकऱ्यांनी मदत कार्य केले. मृत्यदेह देह गावातील रुग्णवाहिकेत टाकून सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आला अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.