Supriya Sule (Photo Credit- X)
मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर, राजकीय नेते जरांगे यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडत आहेत आणि सरकारवर या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या.
त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लवकरात लवकर यावर मार्गकाढून सरकारने निर्णय घ्यावा असे त्यांनी सागिंतले. तसेच या भेटीदरम्यान त्यांनी राज्य सरकारला या गंभीर प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलावण्याची आणि सर्वपक्षीय बैठक घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली.
त्यानंतर, मनोज जरांगे यांची भेट घेऊन परतत असताना मराठा आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीचा ताफा अडवला आणि शरद पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी त्यांना घेरले आणि एक मराठा, एक लाख मराठा अशा घोषणा देऊ लागले. काही आंदोलकांनी खासदार शरद पवार यांच्या विरोधातही घोषणाबाजी केली. या सर्वांमुळे जरांगे यांच्या निषेधस्थळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. तथापि, काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंना मार्ग दाखवला आणि त्यांच्या गाडीपर्यंत पोहोचण्यास मदत केली.
आझाद मैदानावर खासदार सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव
शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर आंदोलकांनी सुळेंना अडवले #मराठाआरक्षण #marathaprotest pic.twitter.com/jZbyw2uXe2
— Seema Adhe (@AdheSeema) August 31, 2025
मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर, सुप्रिया सुळे शांत राहिल्या. त्यांनी प्रत्येक आंदोलकाचे हसून स्वागत केले. त्यांनी सर्वांशी हस्तांदोलनही केले. सर्वांना अभिवादन केल्यानंतर त्या त्यांच्या गाडीत बसल्या आणि निघून गेल्या, नंतर, आदोलकांनीही त्यांच्या गाडीचा पाठलाग केला त्याच्यावर गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेरले आणि मोठ्याने घोषणाबाजी केली. या सर्व घडामोडींमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु काही आंदोलकांनी सुळे यांच्या गाडीला रस्ता दिला.
दरम्यान, मनोज जरांगे हे मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे वारंवार आवाहन करत आहेत. काहीही झाले तरी आक्रमक होऊ नका. शांत राहा. जरांगे आंदोलकांना सांगत आहेत की त्यांना शांततेने आरक्षण हवे आहे. तथापि, काही आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.