सोलापूर: सोलापूरमध्ये (Solapur) रेडीमेड गारमेंट्सच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या भीषण आगीमध्ये रेडीमेड गारमेंट्सचे 2 कारखाने जळून खाक (Solapur Fire News) झाल्याची माहिती मिळाली आहे. दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी मंदिराशेजारील कारखान्यांना आग लागली आहे. नागरी वस्तीत ही आग लागल्याने अग्निशमन दल सतर्क झाले आहे.
[read_also content=”वाचाळ इम्रान की पुराचे धोके… पाकिस्तानला जास्त कोणी बुडवले? भारतासाठी धोका किती? https://www.navarashtra.com/world/badbole-imran-or-flood-disaster-who-drowned-pakistan-more-good-news-or-danger-for-india-365615.html”]
दरम्यान,आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गड्डम आणि कुरापाटी हे दोन रेडीमेड गारमेंट्स कारखाने (Fire In Readymade Garments Factory) आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. सुरुवातीला एका कारखान्याला लागलेली आग दुसऱ्या कारखान्यापर्यंत पोहोचली आणि प्रचंड नुकसान झाले. आगीत 5 दुकानांचंही नुकसान झालं आहे. सोलापूर अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.