Dhananjay Munde : धनंजय मुंडे हे परळी येथून लातूर विमानतळाकडे निघाले होते. त्यांच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. त्यांचा गाडीचा ताफा लातूर येथे आला असता आंदोलकानी ताफा अडवला.
सोयाबीन संशोधन केंद्रासाठी आंदोलक आक्रमक
लातूरमधील सोयाबीन संशोधन केंद्रासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. परळी येथून लातूर आजारी आईला घेऊन जाणाऱ्या धनंजय मुंडे यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत काळे झेंडे न दाखवता फक्त निवेदन दिले. लवकरच मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले.
अनेक संघटनेने केला विरोध
लातूर येथील प्रस्तावित सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवनी गोवंश संवर्धन केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाला लातूरमधील शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि त्याचबरोबर अनेक संघटनेने विरोध केला होता. या निर्णयाविरोधात मागील काही दिवसांपासून विविध आंदोलने आणि उपोषणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनंजय मुंडे यांना लातूरमध्ये फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता.
परळी येथून लातूर विमानतळाकडे निघाले
आज धनंजय मुंडे हे परळी येथून लातूर विमानतळाकडे निघाले होते. त्यांच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. त्यांचा गाडीचा ताफा लातूर येथे आला असता आंदोलकांनी ताफा अडवला. त्यांची परिस्थिती लक्षात घेता काळे झेंडे दाखवणे किंवा कसलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. यावेळी धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी लवकरच मुंबई येथे बैठक घेऊ आणि त्या बैठकीत योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील प्रस्तावित सोयाबीन आणि देवणी गोवंश संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात नेल्याने लातूर येथील शेतकरी आणि पक्ष संघटनांनी पवित्रा घेतला आहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत बंद ठेवून निषेधदेखील व्यक्त करण्यात आला. लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हमाल माथाडी युनियनचे जिल्हा अध्यक्ष बालाजी जाधव हे शनिवार, 23 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना अनेक संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. भविष्यात हे आंदोलन व्यापक होईल, असे चित्र दिसत आहे. जोपर्यंत कागदोपत्री संशोधन केंद्राचा निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जाधव यांनी घेतली आहे.
देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध
मागील अनेक वर्षांपासून होणार होणार, अशी चर्चा असलेले सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र लातूरऐवजी बीडला झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध आहे, असे असताना प्राथमिकता लातूरऐवजी बीडला देण्यात आली आहे. यामुळे लातुरात याचे तीव्र पडसाद उमटले. कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवसासाठी बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्ह्यात फिरू देणार नसल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाने केली होती. त्यास काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला होता.
Web Title: Fleet of dhananjay munde was intercepted by aggressive shiv sainiks as soon as a sick mother was seen in car flags were lowered nryb