पृथ्वीराज चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क
Maharashtra Vidhansabha Nivadnuk :विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.अशातच अनेक मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि कॉँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही प्रचाराला बोलावले नाही. त्यांनी हिंदुत्व वातावरण निर्मिती करून, अल्पसंख्याकांमध्ये द्वेष पसरवून, धर्मा-धर्मांमध्ये, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पैशाचा आणि सत्तेचा मोठ्या प्रमाणात गैरवापरही केला. परंतु, त्यांना कोणत्याही पातळयांवर यश आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीलाच बहुमत मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
माध्यमांच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, माजी गृहमंत्री अमित देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. विनोद तावडेही पैसे वाटताना सापडले. जितेंद्र ठक्कर यांनी महायुतीच्या काही नेत्यांनी टीप दिल्याचे म्हटले आहे. तर काही आणखी कोणी मोठ्या नेत्यांची नावे घेत आहेत. त्यामुळे आपण हरलो तर तावडे यांच्या प्रकरणामुळे हरलो आणि जिंकलो तर तावडे प्रचारातून बाहेर होते, असे बोलले जाईल. परंतु, एकंदरीत वातावरण पाहता राज्यात महाविकास आघाडीच्या दृष्टीने लोकांचा कल असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
हेही वाचा: Maharashtra Election 2024: राज्यात मतदान सुरूच होताच अनेक ठीकाणी EVM पडले बंद, केंद्राबाहेर नागरिकांची प्रचंड गर्दी
नाशिक- दुसरीकडे, नाशिकमधील पंचवटी संकुलातील सोनूबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथ तांत्रिकदृष्ट्या खराब झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे नाशिकमध्ये मतदानाला 20 मिनिटे उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतदानासाठी प्रवेशद्वार उघडण्यात आले आहे.
जळगाव- जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरू न झाल्याने मोठा गोंधळ उडाला. ईव्हीएम मशीन सुरू होण्यास उशीर झाल्याने मतदान केंद्रावर 15 ते 20 मिनिटे उशीर झाला. ईव्हीएम मशीन सुरू करण्यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेतली. यानंतर, 15 ते 20 मिनिटे मशीन सुरू करा आणि नंतर ते सील करा. त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली. हे ईव्हीएम मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक आणि महिला बाहेर थांबून होते.